नाशिकमध्ये खासदारांच्या बंगल्याजवळ दिसला बिबट्या! - nashik
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक : शहरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले असून भाजप खासदार भारती पवार यांच्या गंगापूर रोडवरील आनंद नगर बंगल्याजवळ बिबट्याचा संचार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. बिबट्याच्या दर्शनामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. गंगापूर रोड परिसरात सकाळी साडेसातच्या सुमारास बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना बिबट्या दिसला. हा बिबट्या नरसिंह नगर, आनंद नगर परिसरातून येत खासदार भारती पवार यांच्या घराजवळ आला. नरसिंहनगर मध्ये वनविभाग आणि आनंदवली पोलिस स्टेशनचे कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असून या बिबट्याला पकडण्यासाठी चारी बाजूने जाळी लावण्यात आली आहे. तरी या परिसरात नागरिकांनी बाहेर फिरू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.