जालना वडीगोद्री भागात पावसामुळे शेतकरी हवालदिल - रोतलो ीोगल हज्ोूा
🎬 Watch Now: Feature Video
जालना - जिल्ह्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील वडीगोद्री शिवारात मुसळधार पाऊस झाल्यानं सोंगणीला आलेल्या सोयाबीनचं नुकसान झालंय. सोयाबीनच्या शेंगामधील दाणे पावसामुळे जमिनीवर गळून पडल्यानं शेतकरी हतबल झाला आहे. सततचा पावसामुळे नुकसान झाल्याने जगावे तरी कसे या विवंचनेत शेतकरी अडकला आहे. वडीगोद्री अंबड शहागड या परिसरात पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच दैना उडवली आहे. वारंवार पाऊस पडल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे.