Goa Assembly elections : गोव्यात काँग्रेस आणि भाजपची सेटींग.. लोबो निवडून आल्यावर भाजपात जातील - किरण कंडोळकर - गोवा विधानसभा निवडणूक
🎬 Watch Now: Feature Video
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या घोटाळ्याचा पाढा वाचला असल्याने आपल्याला केव्हा तरी तुरुंगात डांबतील, या भीतीने काँग्रेस हायकमांडने 2017 मध्ये आणि त्यानंतर मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात सरकार स्थापन करण्याची संधी येऊन देखील सरकार स्थापन केले नाही, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते किरण कंडोळकर यांनी केला आहे. मायकल लोबो हे भाजपा नेते अमित शहा यांचे लाडके पेट असून त्यांनीच लोबो यांना काँग्रेसमध्ये पाठवले असून निवडणुकीनंतर लोबो आपल्या सहकाऱ्यांसोबत पुन्हा भाजपामध्ये जातील, असा गोप्यस्फोट कंडोळकर यांनी केला आहे.