ऋषिकेश देशमुखांना ईडीच्या अटकेची भिती - ऋषीकेश देशमुखांचे वकील - 100 कोटी वसुली प्रकरण
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून गेल्या तीन दिवसापासून चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अनिल देशमुख यांच्या 27 कंपन्यांमध्ये व्यवहार झाला असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. यासंदर्भात ईडीने अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स दिलेले होते. परंतु, ऋषिकेश देशमुख ते ईडी कार्यालयात हजर राहू शकणार नाही. यासंदर्भात माहिती देण्याकरिता ऋषिकेश देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग हे ईडी कार्यालयात आले. त्यावेळी त्यांनी ऋषिकेश देशमुख यांना कायद्याप्रमाणे संरक्षण घेण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे ते संरक्षण कशा प्रकारे घ्यायचा या संदर्भात विचार करत आहे. ईडीने अनिल देशमुख यांच्यावर केलेली कारवाई बेकायदेशीर आहे. अनिल देशमुख यांना फक्त चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. हे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे मत इन्द्रपाल सिंह यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे ऋषिकेश देशमुख हे कार्यालयात उपस्थित राहू शकले नाही. ईडी अटक करू शकते याची त्यांना भिती आहे. त्यामुळे ते कायदेशीर संरक्षण घेण्याकरिता ते आज ईडी कार्यालयात आले नाही. कसे कायदेशीर संरक्षण घ्यायचे आहे याचा विचार करत आहे, असे ऋषिकेश देशमुख यांचे वकील इन्द्रपाल सिंह यांनी Etv सोबत बोलताना म्हटले आहे.