ETV Bharat / state

कुस्ती सरावानंतर १४ वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकनं मृत्यू, माणदेशावर शोककळा - WRESTLER BOY DIED

अवघ्या १४ वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकनं (Heart Attack) मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनं माण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Heart Attack
१४ वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकनं मृत्यू (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2025, 9:30 PM IST

सातारा : माण तालुक्यातील मलवडी गावच्या १४ वर्षीय मुलाचा कुस्ती सरावानंतर हार्ट अटॅकनं मृत्यू (Heart Attack) झाला आहे. जय दीपक कुंभार, असं दुर्दैवी मुलाचं नाव असून तो पुण्यातील जाणता राजा कुस्ती संकुलात कुस्तीचा सराव करत होता. या घटनेनं त्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. तसंच कुस्ती क्षेत्रावरही शोककळा पसरली आहे.

मुलाला नामवंत मल्ल बनविण्याचं स्वप्न भंगलं : मलवडी (ता. माण) गावातील दीपक कुंभार यांनी जय या आपल्या एकुलत्या एका मुलाला नामवंत मल्ल बनविण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्या ध्येयानेच त्यांनी मुलाला सरावासाठी पुण्यातील जाणता राजा कुस्ती संकुलात दाखल केलं होतं. ७ ऑगस्ट २०१० रोजी जन्मलेल्या जय याने मलवडी, आंधळी येथे सराव करताना कुस्तीत चुणूक दाखवली होती. स्थानिक कुस्ती मैदानात तो नावलौकीक मिळवत होता. मात्र, लहान वयातच हार्ट अटॅकनं त्याचा मृत्यू झाल्यानं मुलाला नामांकित मल्ल बनविण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं.

शालेय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी : शालेय कुस्ती स्पर्धेत सलग दोन वर्षे जयने १४ वर्षे वयोगटात राज्यपातळीवर तिसरा क्रमांक तर, यावर्षी १७ वर्षे वयोगटातील ६२ किलो वजनी गटात विभागीय पातळीवर तिसरा क्रमांक पटकावला होता. नुकत्याच खंडोबा यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानातही जयने नेत्रदीपक कुस्ती करत वाहवा मिळवली होती.

जयला महाराष्ट्र केसरी झाल्याचं पाहायचं होतं : मुलगा जयला महाराष्ट्र केसरी झाल्याचं वडिलांना पाहायचं होतं. तसंच जयने देशासाठी कुस्तीचं ऑलिम्पिक पदक मिळवावं, हे ध्येय ठेऊन वडील दीपक कुंभार यांनी मुलाला पुण्यातील कुस्ती संकुलात दाखल केलं होतं. मात्र, जयच्या आकस्मिक निधनानं त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं.

माण तालुक्यावर शोककळा : अवघ्या १४ व्या वर्षी उदयोन्मुख मुलाचा मृत्यू झाल्यानं माण तालुक्यावर शोककळा पसरली. पुणे आणि माण तालुक्यातील मल्लांनी मलवडीकडं धाव घेतली. जयचे पार्थिव गावात आणल्यानंतर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. यावेळी उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले. त्याच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते.

हेही वाचा -

  1. चिंताजनक; पहिलीतल्या मुलाचा हार्ट अटॅकनं मृत्यू, हल्ली लहान मुलांच्यातही वाढतोय हृदयविकार
  2. कोर्टाच्या आवारात पक्षकाराला हार्ट अटॅक, वकिलांच्या प्रसंगावधानाने पक्षकाराला मिळालं जीवदान
  3. क्रिकेट खेळताना हार्ट अटॅक आला, तरुणाचा जागीच मृत्यू!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.