ETV Bharat / state

हिंगणा भागामध्ये अपघातात दोन ठार, एक गंभीर, ढाब्यावरील जेवण बेतलं जीवावर - ACCIDENT IN HINGNA

नागपूरमध्ये एका अपघातात २ जणांचा जीव गेला आहे. ढाब्यावरुन जेवण आणताना हा अपघात झाला. वेळीच उपचार मिळाले असते तर त्यातील एकाचा तरी जीव वाचला असता.

अपघातग्रस्त तरुणांचे संग्रहित फोटो
अपघातग्रस्त तरुणांचे संग्रहित फोटो (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2025, 10:02 PM IST

नागपूर - भरधाव ट्रकनं मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोन तरुण ठार जागीचं ठार झाले आहेत. एक तरुण गंभीर झालाय. अपघात हिंगणा-गुमगाव मार्गावर घडलाय. आर्यन हुकूमचंद पालिवाल (२३) आणि सुमेध उर्फ सुमित राहुल सिरसाट (१७) अशी मृतकांची नावं असून अरमान रवींद्र मडामे (१७) नामक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

तीन मित्र जेवणाचा डबा घेऊन मोटरसायकलनं हिंगण्याच्या दिशेनं येत असताना विरुद्ध बाजूने येत असलेल्या ट्रकनं मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये मोटरसायकल चालकासह त्याचा एक मित्र जागीच ठार झाला. तर मागे बसलेला युवक सुद्धा गंभीर जखमी झाला. हा अपघात गुंमगाव मार्गावर घडला.

धाब्यावर जाणे जीवावर बेतले - तिघे मित्र हे मोटरसायकलने धाब्यावरून जेवण आणायला गुमगावकडे गेले होते. तेथून परत घराकडे येत होते. तर समृद्धी महामार्गाकडे जाणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिली या अपघातात चालक आर्यन आणि मागे बसलेल्या सुमेधचा जागीच मृत्यू झाला आहे.

जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू - अपघाताची माहिती समजताचं हिंगणा पोलीस ठाण्याचे निरीक्षण जितेंद्र बोबडे आणि पोलीस उपनिरीक्षक करणसिंह नागलोथ घटनास्थळी दाखल झाले. जखमी अरमानला उपचारासाठी पाठवण्यात आल्यानंतर अपघातास कारणीभूत ट्रक जप्त करण्यात आला आहे.

तर वाचला असता एकाचा जीव - अपघात झाल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावर ट्रक सोडून पळ काढला. अपघातानंतर सुमारे अर्धा तास त्या रस्त्याकडे कुणी फिरकले नाही. त्यामुळे जखमींना जवळपास तासभर उपचार मिळण्यास उशिर झाला. जर ट्रकचालकाने जखमींना लगेच उपचारासाठी मदत केली असती तर सुमित याचा जीव वाचला असता.

हेही वाचा...

  1. अक्कलकोटहून गाणगापूरला जाताना भाविकांवर काळाचा घाला, चार भाविकांचा जागीच मृत्यू, सात जखमी
  2. अभिनेत्री ऊर्मिला कोठारेच्या गाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू, एकजण जखमी
  3. घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोनं ६-७ जणांना चिरडलं; महिलेचा मृत्यू, चार गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.