ETV Bharat / state

धक्कादायक! आणखी एका माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला; दोन्ही पाय तोडले - THANE CRIME NEWS

अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत चारचाकी गाडी फोडत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Thane Crime News
माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2025, 9:27 PM IST

ठाणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असतानाच, अजनुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर भर रस्त्यात कार अडवून अज्ञात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यात माजी सरपंचाचे दोन्ही पाय तोडल्यानं त्यांच्यावर कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लखोरांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. कदम उघडे असं हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या माजी सरपंचाचे नाव असून त्यांच्या कारची देखील तोडफोड करण्यात आली आहे. तर पोलिसांनी हल्लखोराचा शोध सुरू केल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गावित यांनी दिली.

कारची तोडफोड आणि बेदम मारहाण : मिळालेल्या माहितीनुसार, अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे हे आपल्या कामानिमित्ताने कारने एकटेच आज सकाळी (२ जानेवारी) बाहेर निघाले होते. मात्र त्याच सुमारास अजनुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या गायधरा गावाच्या माळरानात काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार आडवली आणि कारवर दगडफेक केली. त्यानंतर कारमधून उघडे यांना बाहेर काढत बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना शहापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र डॉक्टरांनी पायचं हाड तुटल्याचं सांगितलं. यामुळं पुढील उपचारासाठी त्यांना कल्याण येथे पाठवण्यात आल्याचं गावित यांनी सांगितलं.

माजी सरपंचावर अज्ञात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला (ETV Bharat Reporter)

हल्लेखोरांचा शोध सुरू : याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत असून माजी सरपंच उघडे यांच्यावर हल्ला का आणि कशामुळं झाला याचं कारणही आरोपी पकडल्यानंतर समोर येणार आहे. तर लवकरच आरोपीला अटक केली जाणार आहे आणि पुढील तपास कसारा पोलीस करत असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गावित यांनी दिली.

हेही वाचा -

  1. ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंच्या गाडीवर हल्ला; चालकानं सांगितला हल्ल्याचा थरार
  2. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना, एसआयटीत सर्व अधिकारी बीडचे!
  3. अखेर वाल्मिक कराडची शरणागती: कार्यकर्ते म्हणतात 'वाल्मिक कराड आमच्यासाठी देव माणूस'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.