मुंबई - साऊथ सुपरस्टार राम चरणच्या बहुप्रतीक्षित 'गेम चेंजर' या चित्रपटाच्या ट्रेलरनं लॉन्च होताच धमाका केला आहे. या पॉलिटिकल अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर आज 2 जानेवारी रोजी रिलीज झाला. 'गेम चेंजर'चा ट्रेलर २ जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याची अपडेट दिल्यानंतर प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहात होते. दक्षिणेतील दिग्गज दिग्दर्शक शंकर आणि राम चरण या जोडीचा हा पहिलाच चित्रपट आहे. 'गेम चेंजर'मध्ये राम चरणबरोबर बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
भ्रष्टाचार निर्मूलनासाठी राम चरण डबल रोलमध्ये येत आहे
ट्रेलरमध्ये राम चरण दुहेरी भूमिकेत भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवताना दिसत आहे. एकीकडे तो आयएएस आहेत तर दुसरीकडे त्यानं सामान्य माणसाची भूमिका साकारली आहे. कियारा अडवाणी त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे. या रामचरण धमाकेदार अॅक्शन करताना दिसत आहे.
राजामौली यांनी केला 'गेम चेंजर'चा ट्रेलर लाँच
हैद्राबाद येथील कोंडापूर येथे एका कार्यक्रमात गेम चेंजरचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. गेम चेंजरचा ट्रेलर दक्षिणेकडील दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी AMB सिनेमातून लॉन्च केला आहे. त्याचबरोबर अल्लू अर्जुनचे संध्या थिएटर प्रकरण लक्षात घेऊन निर्मात्यांनी चित्रपटगृहांमध्ये विशेष सुरक्षेची व्यवस्था केली होती. यावेळी येथे येणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता गेण्यात आली होती. थिएटरमध्ये केवळ तिकीट असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात होता. चित्रपटगृहाबहोर आणि आतमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
स्टारकास्ट आणि त्यांच्या भूमिका
डबल रोलमधील पहिल्या भूमिकेत राम चरण आयएएस राम नंदनची भूमिका साकारणार आहे आणि दुसऱ्या भूमिकेत तो अपण्णा म्हणजेच रामच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. अंजली अपण्णा यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कियाराची जबिलम्माची भूमिका आहे. एसजे सूर्या 'मोपीदेवी'च्या भूमिकेत, श्रीकांत 'सत्यमूर्ती'च्या भूमिकेत आणि जयराम मुख्यमंत्री रामचंद्र रेड्डी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. सुनील, नासिर, शुभलेखा सुधाकर, प्रकाश राज, प्रवीणा आणि मुरली शर्मा या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं बजेट सुमारे 400 कोटी रुपये आहे. या चित्रपटाचे निर्माते दिल राजू आणि शिरीष आहेत. गेम चेंजरमध्ये एस. संगीत थमन यांचे आहे आणि चित्रपट श्री वेंकटेश्वर क्रिएशन्सच्या बॅनरखाली बनला आहे. 166 मिनिटांचा हा चित्रपट 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला U/A प्रमाणपत्र मिळाले आहे.
हेही वाचा -