thumbnail

By

Published : Aug 16, 2021, 10:12 AM IST

ETV Bharat / Videos

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चालक सुखरूप

पालघर- मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कार मात्र आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मनोर जवळील कुडे येथे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरातकडे जाणाऱ्या या कारने अचानक पेट घेतला. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. कारला आग लागल्याचे निदर्शनास येताच कार चालकाने आपली कार महामार्गाच्या बाजूला घेऊन उभी करत कारबाहेर धाव घेतली. त्यानंतर क्षणार्धात आगीने संपूर्ण कारला आपल्या भक्ष्यस्थानी घेतले. कारचालक वेळीच कारमधून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. कारमधील CNG गॅस लिक झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.