Video: दरड कोसळून विक्रोळीत पाच जणांचा मृत्यू - President of India twit
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12495534-574-12495534-1626594979376.jpg)
मुंबई - शहरात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारची रात्र ही मुंबईसाठी काळरात्र ठरली आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबईतील विविध भागात दुर्घटना घडल्या आहेत. विक्रोळी सूर्यानगर येथे एका घरावर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून मदत कार्य सुरू आहे. याबाबतचा आढावा 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी घेतला आहे.