Chandrashekhar Bawankule : संजय राऊतांच्या टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, मोदींना दोषी धरणे... - चंद्रशेखर बावनकुळे संजय राऊत
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - सरकार कोणाचेही असले तरी ईडी नियमाप्रमाणे करवाई करते. ईडीची निर्मिती काँग्रेसच्या काळात झाली असून, याचा कायदा आहे. कारवाई कश्या पद्धतीने झाली पाहिजे हे अधोरेखित असल्याचे भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ते भाजप स्थापना दिवसानिमित्त माध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली ते चुकीची झाली असेच म्हणणार ( Chandrashekhar Bawankule Reply Sanjay Raut ) आहे. चुकीची कारवाई झाल्याचे राऊत यांना वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. प्रत्येक वेळी करवाई झाली म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोषी धरणे योग्य नाही, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST