Nashik Accident : नाशिकमध्ये अपघात, मद्यधुंद चालकाने भरधाव कार थेट दुकानात घुसवली - कार घुसली दुकानात
🎬 Watch Now: Feature Video
नाशिकच्या निफाड तालुक्यात एक मद्यधुंद चालक गाडी घेऊन थेट किराणा दुकानात घुसल्याची घटना घडली आहे. या घटनेत किराणा दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी दुकानदाराने आणि ग्राहकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. भरधाव कार थेट किराणा दुकानात घुसल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर ( car enters into shop in Nashik ) आले आहे. कार इतकी जोरात होती की त्यात कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर निफाड पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.