कर्नाटकातील मनमोहक 'फुलपाखरू पार्क' - पश्चिम घाट फुलपाखरू पार्क न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10780854-thumbnail-3x2-butter.jpg)
बंगळुरू - कर्नाटकातील पश्चिम घाटाचा प्रदेश पूर्णपणे घनदाट जंगलांनी आणि नैसर्गिक संसाधनांनी आच्छादलेला आहे. निसर्गाची या भागावर मोठी कृपादृष्टी आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या पश्चिम घाटाची सुंदरता आणखी वाढवण्यासाठी वन विभागाने जोएडामध्ये एक फुलपाखरू पार्क तयार केला आहे. काली नदीच्या किनारी भागात वन विभागाने जंगलात 30 पेक्षा जास्त प्रकारच्या फुल झाडांची लागवड केली. यात टेरी फ्लॉवर, पेन्टास, मिल्कवीड, गॉड फ्लॉवर यांचा समावेश आहे. या फुलांवर उपजिविका करणाऱया, एंगल्ड पिय्रोट बटरफ्लाय, ग्रे काउंट बटरफ्लाय, पिको फॅन्सी बटरफ्लाय, जुनोनिया एटलिट्स आणि पूर्व टायगर स्वॉलटेल या फुलपाखरांच्या प्रजाती याठिकाणी आढळतात.