Solapur Ram Navami : सोलापुरात राम नवमीनिमित्त शिवसेनेची भव्य शोभायात्रा.. मुस्लिम, दलित बांधवांचाही सहभाग

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 10, 2022, 4:09 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

सोलापूर- राम मंदिर होण्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा ( Ram Mandir Ayodhya Shivsena ) आहे. बाबरी पाडल्यावर ( Babari Mosque Demolition ) शिवसेनाप्रमुखांनी पुढे येत शिवसैनिकांनी हे कृत्य केले असेल तर मला त्याचा अभिमान आहे, असं वक्तव्य केलं होत. आम्ही कडवट हिंदुत्ववादी आहोत, मात्र आम्ही कुठल्या धर्माचा अनादर करत नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम बरडे यांनी दिली. सोलापुरातील शिवसेनेच्या भव्य राम नवमी शोभायात्रेदरम्यान ते बोलत ( Solapur Shivsena Procession ) होते. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या भगवान श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा केला जातो. सोलापुरात शिवसेनेच्या वतीने राम नवमीनिमित्त भगवान श्रीराम यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सोलापुरातील सर्व राम मंदिरात भजन कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेली भव्य शोभा यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात ( Solapur Shivsena Procession ) झाली. शोभायात्रेचा समारोप नवी पेठ येथील राम मंदिर येथे झाला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोरोना महामारीचा शिरकाव झाल्याने सोलापुरातील सार्वजनिक उत्सव आणि मिरवणुकांवर निर्बंध आले होते. कोणत्याही मिरवणुकीला स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारली होती. हळूहळू कोरोना महामारीचा प्रकोप कमी होत असून, शासनाने निर्बंधातुन शिथिलता देखील दिली आहे. कोरोना महामारीनंतर म्हणजेच तब्बल दोन वर्षानंतर सोलापुरात मिरवणूका पहावयास मिळत आहेत. आज रविवारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक करण्यात आली. पारंपरिक वाद्याच्या तालावर शिवसैनिकांनी जल्लोषात ठेका धरला होता. या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता. प्रभू श्री रामाच्या जन्मोत्सवनिमित्ताने सोलापुरात शिवसेनेने काढलेल्या रॅलीत मुस्लिम समाज बांधवांच्या उपस्थितीत जय श्रीरामचा नारा देण्यात आला. डॉल्बीला फाटा देत शिवसेनेने हलगी, ढोल, ताशा अशा पारंपरिक वाद्यांना महत्व दिले. या मिरवणुकीत हिंदू, मुस्लिम, दलित बांधवांचाही सहभाग असल्याचे जिल्हाप्रमुख बरडे यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.