125 Gold Roses Gift : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना 125 सोन्याच्या गुलाबांचा गुच्छ भेट - 125 Gold Roses Gift
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या विवाहसोहळ्याला ( Ranbir Kapoor and Alia Bhatt marriage ) सुरुवात झाली आहे. हा विवाह सोहळा चर्चेचा ठरत आहे. आलिया आणि रणवीर या जोडप्याचा चाहता असलेल्या एका दोन चाहत्यांनी सोन्याचा पुष्पगुच्छ ( bouquet of gold plated roses ) दिला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा हा फॅन सुरतहून मुंबईत आला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वीरेंद्र चावलाच्या वॉलवरून सोशल मीडियावरील एका फॅन पेजने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या पुष्पगुच्छात सोन्याचा मुलामा चढवलेली गुलाबाची फुले आहेत. तसेच हातात पुष्पगुच्छ घेऊन उभ्या असलेल्या या जोडप्याचा हा चाहता खूपच आनंदी दिसत आहे. ज्वेलर्स दीपक चोक्सी ( Jewelers Deepak Choksi ) यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा आणि सून आलिया भट्ट आणि रणवीर कपूरचे चाहते आहेत. या पुष्पगुच्छाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सोन्याचा मुलामा असलेले 125 गुलाब ठेवण्यात ( bouquet of 125 gold-plated roses ) आले आहेत. एकाची किंमत 1700 ते 2000 रुपये आहे. हे पाच दिवसांत तयार झाले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST