ENGvsPAK : चौथ्या दिवशीही पावसाचे वर्चस्व - england vs pakistan score news
उपाहारापर्यंत इंग्लंडकडून डॉम सिब्ले २ आणि जॅक क्रॉले ५ धावांवर खेळत होते. रोरी बर्न्स खाते न उघडता शाहिन आफ्रिदीच्या चेंडूवर तंबूत परतला. तिसऱ्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू खेळवता आला नाही.
साऊथम्प्टन - एजेस बाऊलवर सुरू असलेल्या इंग्लंड आणि पाकिस्तानमधील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशीही पावसाने वर्चस्व राखले. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या दोन सत्रात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ही कसोटी आता बरोबरीत सुटण्याची चिन्हे आहेत. तत्पूर्वी, इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाला सुरूवात केली असून उपाहारापर्यंत त्यांनी १ बाद ७ धावा केल्या होत्या.
उपाहारापर्यंत इंग्लंडकडून डॉम सिब्ले २ आणि जॅक क्रॉले ५ धावांवर खेळत होते. रोरी बर्न्स खाते न उघडता शाहिन आफ्रिदीच्या चेंडूवर तंबूत परतला. तिसऱ्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू खेळवता आला नाही.
तत्पूर्वी, पाकिस्तानचा पहिला डाव २३६ धावांवर आटोपला आहे. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने १३९ चेंडूत सात चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्याच्याशिवाय आबिद अलीने ६०, बाबर आझमने ४७ आणि कर्णधार अझर अलीने २० धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने ४, जेम्स अँडरसनने ३ आणि सॅम करन आणि ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तान १-० ने पिछाडीवर आहे. दहा वर्षांनंतर पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याच्या उद्देशाने इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आहे.