शिर्डी Krunal Pandya Visits Shirdi : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाला पांड्यानं आज शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी मी पहिल्यांदाच शिर्डीला आलो असल्याचही यावेळी कृणाल पांड्यानं सांगितलं.
दर्शनानंतर वेगळीच ऊर्जा मिळते : यावेळी दर्शनानंतर बोलताना कृणाल पांड्या म्हणाला, "साईबाबांची महती मी ऐकली होती. बाबा सर्वांचं ऐकतात म्हणून दररोज लाखो भाविक शिर्डीत साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात. आज साईबाबांचं दर्शन घेवून मनाला समाधान वाटलं." तसंच, साईबाबांच्या शिर्डीत एक वेगळीच ऊर्जा मिळते असं ऐकलं होतं. आज ते प्रत्यक्षात अनुभवलायला मिळाल्याचं क्रिकेटपटू कुणाला पांड्यानं साईबाबांच्या दर्शनानंतर संस्थानच्या अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितलं.
संस्थानच्या वतीनं पांड्याचा सत्कार : साई बाबांच्या दर्शनानंतर कुणाला पांड्यानं साईबाबा संस्थानच्या जनसंपर्क विभागातील अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांच्याकडून साई बाबांच्या समाधी व गुरुस्थान द्वारकामाई या मंदिरांबदल माहिती घेतली. तसंच कुटुंबियांना लवकरच शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी घेवून येणार असल्याचंही पांड्यानं यावेळी सांगितलं. साई बाबांच्या दर्शनानंतर पांड्याचा संस्थानच्या वतीनं शॉल आणि साईंची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
RCB कडून खेळणार आयपीएल : मागील महिन्यात झालेल्या इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या मेगा लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं फिरकी अष्टपैलू कृणाल पांड्याला खरेदी केलं आहे. लिलावात आरसीबी संघानं कृणाल पांड्यासाठी 5.75 कोटी रुपयांची बोली लावली. लिलावात राजस्थान रॉयल्सनंही कृणाल पांड्याला आपल्या संघात घेण्यासाठी खूप प्रयत्न केले पण आरसीबीनं अंतिम बोली जिंकली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द कशी : कृणाल पांड्या भारतीय संघाकडून वनडे आणि T20 क्रिकेट खेळला आहे. कृणालनं 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध T20 क्रिकेटमधून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. तथापि, कृणाल गेल्या बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. कृणाल पांड्यानं आतापर्यंत भारतासाठी एकूण 2 वनडे आणि 15 T20 सामने खेळले आहेत. वनडे सामन्यांमध्ये, कृणालनं 130 धावा केल्या आहेत आणि 2 बळी घेतले आहेत. तर 15 T20 सामन्यांमध्ये कृणालनं 124 धावा केल्या आहेत आणि 15 विकेट्सही घेतल्या आहेत.
हेही वाचा :