सेंट किट्स BANW Beat WIW by 60 Runs : बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा वनडे सामना 21 जानेवारी रोजी वॉर्नर पार्क, बासेटेरे, सेंट किट्स इथं खेळवण्यात आला. या सामन्यात पाहुण्या बांगलादेशनं वेस्ट इंडिजचा 60 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. विशेष म्हणजे बांगलादेशच्या महिला संघानं क्रिकेटच्या इंतिहासात वेस्ट इंजडिजला पहिल्यांदाच कोणत्याही फॉरमॅटमध्ये पराभूत केलं आहे.
🎉 Dressing room celebrations! 🇧🇩 Bangladesh Women’s Cricket Team savor their historic ODI victory in the Caribbean! 🌴🏏 A moment of pure joy and pride!#BCB #Cricket #Womenscricket #WIWvBANW #Bangladesh pic.twitter.com/wPIi1ooEEK
— Bangladesh Cricket (@BCBtigers) January 22, 2025
कॅरेबियन संघ स्वतात बाद : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघ 184 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 124 धावांवर गारद झाला. बांगलादेशकडून नाहिदा अख्तरनं शानदार कामगिरी केली. नाहिदा अख्तरनं 10 षटकांत 31 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले आणि फलंदाजीत 9 धावांचं योगदान दिलं. नाहिदाला तिच्या या कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आलं. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना मालिकेचा विजेता ठरवेल.
📸 Snaps from the historic first-ever ODI victory by 🇧🇩 Bangladesh Women against West Indies Women on Caribbean soil! 🌴🏏
— Bangladesh Cricket (@BCBtigers) January 22, 2025
PC: WIC#BCB #Cricket #Womenscricket #WIWvBANW #Bangladesh pic.twitter.com/CoEyYM3FZ5
बांगलादेशची प्रथम फलंदाजी : वेस्ट इंडिजच्या महिला संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, बांगलादेशला सुरुवातीलाच 34 धावांवर धक्का बसला. यानंतर बांगलादेशनं ठराविक अंतरानं विकेट गमावल्या आणि 48.5 षटकांत 184 धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशकडून निगार सुलतानानं कर्णधारपदाची खेळी केली. निगार सुलतानानं 120 चेंडूत 68 धावा केल्या. तर शोभना मोस्टारीनं 23 आणि शोर्ना अख्तरनं 21 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून करिश्मा रामहारॅकनं 10 षटकांत 33 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. करिश्मा रामहारॅक व्यतिरिक्त, आलिया अॅलेननं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
History made! 🇧🇩
— Bangladesh Cricket (@BCBtigers) January 22, 2025
Bangladesh Women secure their first-ever ODI victory against West Indies Women on their debut tour to the Caribbean! 🌴🏏
Match Details 👉: https://t.co/mF7O6UjO4g#BCB #Cricket #Womenscricket #WIWvBANW #Bangladesh pic.twitter.com/Z9BAIdEXJj
वेस्ट इंडिजची फलंदाजी अपयशी : बांगलादेशनं दिलेल्या 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ अनपेक्षितपणे 35 षटकांत 135 धावांवर सर्वबाद झाला. वेस्ट इंडिजकडून शेमेन कॅम्पबेलेनं सर्वाधिक 28 धावा केल्या. याशिवाय हेली मॅथ्यूजनं 18 धावांचं योगदान दिलं आणि आलिया एलननं 15 धावांचे योगदान दिलं. बांगलादेशकडून नाहिदा अख्तरनं 3 विकेट्स घेतल्या. राबेया खान आणि फहिमा खातून यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
🎥 Karishma Ramharack | 2nd CG United ODI Press Conference v Bangladesh Women.#WIWvBANW | #MaroonWarriors pic.twitter.com/OLMQ3vkfO5
— Windies Cricket (@windiescricket) January 22, 2025
बांगलादेशचा पहिलाच विजय : या विजयासह बांगलादेश आता महिला वनडे अजिंक्यपद गुणतालिकेत 21 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड सहाव्या स्थानावर आहे आणि अव्वल पाच संघांना थेट जागतिक स्पर्धेत प्रवेश मिळेल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना महिला अजिंक्यपद चक्रातील अंतिम सामना देखील असेल. विशेष म्हणजे बांगलादेशनं वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत चार T20 आणि तीन वनडे सामने खेळले आहेत आणि कॅरिबियन संघावर हा त्यांचा पहिला विजय आहे.
हेही वाचा :