ETV Bharat / state

डावोसमधील मुख्यमंत्र्यांचा अवतार पाहून आठवतील त्यांचे मॉडेलिंगचे दिवस - DEVENDRA FADNAVIS IN DAVOS

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावोसमध्ये पर्यटनाचा आनंदही लुटल्याचं दिसतंय. त्यांच्या फेसबुक पेजवरील फोटोंवर शेलक्या प्रतिक्रिया येत आहेत.

देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमध्ये
देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमध्ये (सौ. - फडणवीस यांचे फेसबुक पेज)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2025, 4:04 PM IST

Updated : Jan 22, 2025, 4:56 PM IST

हैदराबाद - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या स्वित्झर्लंडची हवा खात आहेत. जगात सगळ्यात शुद्ध हवा कुठे असेल तर ती स्वित्झर्लंडमध्ये असं म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या विकासाकरता बक्कळ गुंतवणूक आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस सध्या डावोस दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये त्यांनी तेथील पर्यटनाचाही आनंद लुटल्याचं, त्यांनीच फेसबुकवर पोस्ट केलेल्या फोटोंच्यावरुन दिसून येतय.

डावोसच्या स्वच्छ आणि सुंदर तळ्यात यॉटवर निसर्गाचा नयनचक्षुंनी आनंद लुटताना देवेंद्र फडणवीस यांना पाहिलं की, त्यांच्याच जुन्या मॉडेलिंगच्या फोटोंची आठवण येते. अतिशय रुबाबदार दिसणारे देवेंद्र फडणवीस मॉडर्न वेस्टर्न विंटर लुकमध्ये अधिकच खुलून दिसत आहेत. विशेष म्हणजे ते अगदी फिट दिसत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या या फोटोंवर भन्नाट कमेंटही केल्या जात आहेत.

त्यांच्या एका चाहत्यानं, "Great going Sir, Maharashtra is proud of you for the efforts you are putting for the betterment of our state..." अशी कमेंट केली आहे.

तर दुसऱ्या एका चाहत्यानं, "I hope you will bring Switzerland like infrastructure, hospital and education system in Maharashtra so Swiss citizens will be encouraged to visit Maharashtra and pose similar to you. We tax payers not getting anything in return compared to developed EU Countries." अशी कमेंट केली आहे. अर्थात या चाहत्यानं स्वित्झर्लंड सारखीच रुग्णालय व्यवस्था, शिक्षण व्यवस्था महाराष्ट्रातही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जेणेकरुन स्वित्झर्ल्डंचे नागरिक महाराष्ट्रात येतील आणि अशीच पोज देतील.

तर एका चाहत्यानं म्हटलय, "सगळेजण नाईस बोलले स्वित्झर्लंड मध्ये जाऊन आपण महाराष्ट्रातला शेतकरी विसरलाय 10-26-26 ची बॅग 460 रुपयांवरून सतराशे रुपये झाली आणि उसाचा रेट सात ते आठ वर्ष जसाच्या तसाच राहिला आहे. हे झालं उसाचं मी बाकीच्या शेतकऱ्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा रेट तिप्पट व्हायचे ऐवजी कमीच होत आहे. त्याच्यामुळे शेतकरी हा येणाऱ्या काळामध्ये कर्जबाजारी तर होणारच आहे त्याचबरोबर आत्महत्याचा रेट देखील वाढणार आहे त्याच्यामुळे राजकारणी मजा करत आहेत औद्योगिक क्रांती करत आहेत पण शेतकऱ्यांची क्रांती कोण करणार? हा अजूनही अनुत्तरीत प्रश्न आहे."

वास्तविक देवेंद्र फडणवीस हे डावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी गेले आहेत. तिथे जागतिक गुंतवणूकदारांना ते महाराष्ट्रात गुंतवणुकीचं आवाहन करणार आहेत. त्यातून राज्यात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक होईल अशी अपेक्षा आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. यातून सुमारे 92 हजार 235 रोजगार निर्मिती होणार आहे. यातील सर्वात मोठा करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्याबरोबर करण्यात आला. तो स्टील, नविनीकरण ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयन बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे.

हेही वाचा...

  1. दावोसमध्ये देवाभाऊंचा डंका; उद्योगपती म्हणतात, 'बाहर बर्फ, लेकीन अंदर गरमी है'; पहिल्याच दिवशी 'इतक्या' कोटींचे करार
  2. देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व

Last Updated : Jan 22, 2025, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.