Peeled VS Unpeeled Garlic: लसणाला पोषक तत्वांचा पॉवरहाऊस म्हणून ओळखलं जातं हे सर्वांना माहिती आहे. नियमित लसूण खाण्याच्या फायद्याबद्दल कुणीही अलिप्त नाही. विशेषत: हिवाळ्यामध्ये थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून मोठ्या प्रमाणात लसूण खाल्लं जातं. तज्ज्ञांच्या मते, लसूण केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवत नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. लसूणामध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, झिंक, लोह, फायबर सारखे पोषक घटक असतात. जे अॅंटीऑक्सिडेंट, अॅंटीफंगल, आणि अॅंटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहेत. परंतु लसणाचं सेवन मर्यादित प्रमाणात केलं पाहिजे. अन्यथा तुम्हाला श्वासाची दुर्गंधी, अॅसिडिटी, छातीत जळजळ तसंच इतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. परंतु लसूण सोलून खावं की, छिलक्यासह हे तुम्हाला माहिती आहे काय?

- लसूण कसं खावं?
लसूण सोलून खाल्लं जातं. परंतु असे काही लोक आहेत की, ते लसूण छिलक्यासह खातात. यामुळे लसूण खाण्याची योग्य पद्धत कोणती याबद्दल तज्ज्ञांनी सांगितलं की, लसणाच्या पाकड्यामध्ये पोषक तत्वांचा खजिना दळला आहे. लसणाच्या अॅंटीऑक्सिडेंट घटकामुळे त्याचे छिलके फायदेशीर आहे. परंतु साल पचायला जड असल्यामुळे छिलक्यासह लसूण खाणं टाळलं पाहिजे. तसंच लसणाच्या सालीमध्ये कीटकनाशकाचे कण अडकूण असतात. ज्यामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

- लसणाच्या छिलक्याचा अशाप्रकारे करा वापर: लसणाचा छिलका खाण्यायोग्य नसला तरी तो डस्टबिनमध्ये फेकून न देता तुम्ही इतर मार्गांनी त्याचा वापर करू शकता. छिलका रात्रभर पाण्यात भिजू ठेवा आणि सकाळी उकळून ते पाणी बागकामासाठी वापरा. लसणाच्या प्रतिजैविक गुणधर्मामुळे वनस्पतींचे कीटक आणि बॅक्टेरियापासून संरक्षण होते. लसणाच्या छिलक्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, आणि फायटोन्यूट्रिएंट्स देखील असतात. जे वनस्पतींच्या वाढीस मदत करतात.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://www.tandfonline.com/doi/abs/10.1080/07373930500538717