मुंबई Virat Kohli Video : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचं चाहत्यांशी असलेलं वर्तन पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात कोहली भारतीय सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन करताना दिसत आहे. विराट मुंबईतील त्याच्या घरातून अलिबागला जात असताना ही घटना घडली. व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की जेव्हा विराट त्याच्या गाडीतून उतरतो तेव्हा उत्साही चाहत्यांची गर्दी त्याच्याभोवती असते, ज्यात एक CISF जवान देखील असतो जो त्याच्यासोबत सेल्फी घेऊ इच्छित होता. कोहलीनं त्याची इच्छा नाकारली आणि तो न थांबता पुढं गेला.
एक वीडियो वायरल हो रही है जिसमें विराट कोहली ने बेहद ही शर्मनाक हरकत की है,
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) January 21, 2025
विराट कोहली कहीं अपनी कार से उतरते हैं और वो आगे चलने लगते हैं तभी
हमारी सेना के एक जवान ने अपना फोन निकालकर विराट कोहली के साथ सेल्फी लेनी चाही मगर
विराट कोहली ने उसे अपना हाथ उठाकर मना कर दिया,… pic.twitter.com/sAgPjc32Ht
कोहलीवर सडकून टीका : या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झाला जिथं अनेक चाहत्यांनी कोहलीच्या वागण्यावर टीका केली. काहींनी याला भारतीय सैन्याच्या सैनिकाचा अनादर म्हटलं, तर अनेकांनी असंही स्पष्ट केलं की व्हिडिओतील व्यक्ती भारतीय सैन्यातील नसून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (CISF) आहे. सीआयएसएफ ही एक सशस्त्र पोलिस दल आहे जी भारतातील मोठ्या संस्थांचं रक्षण करते, ज्यात सरकारी, संयुक्त उपक्रम आणि खाजगी औद्योगिक प्रतिष्ठाने यांचा समावेश आहे. विराट कोहलीच्या या वागण्यावर चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ते कोहलीच्या वैयक्तिक सीमांचा आदर करण्याचं लक्षण असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी त्याच्या वृत्तीचा संबंध अहंकाराशी जोडला. अनेक चाहत्यांचा असं मत आहे की विराट एक सार्वजनिक व्यक्ती असल्यानं त्यानं अधिक संयम आणि नम्रता दाखवायला हवी होती.
This is how we should respect our police officers and Army man.🙂
— 𝐕𝐢𝐬𝐡𝐮 (@Ro_45stan) January 20, 2025
He told his family to leave and then took pictures with a police officer.🫡 pic.twitter.com/4367nA8tEM
रोहितनं काढला सेल्फी : दरम्यान, आणखी एक व्हिडिओ विमानतळावरील व्हायरल झाला असून यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा विमानतळावर आल्यानंतर चेकअप पूर्ण झाल्यानंतर बायको आणि मुलगीला पुढं पाठवून उपस्थित पोलीस आणि चाहत्यांसोबत आरामात सेल्फी काढताना दिसून येत आहे. आणखी एका जवानासोबतचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळं या दोन्ही व्हायरल व्हिडिओची तुलना करत कोहलीवर चांगलीच टीका होत आहेत.
— follow @CtrlMemes_ (@ctrlmeme) January 20, 2025
दोघंही दशकभरानंतर खेळणार रणजी सामना : दरम्यान विराट कोहली 2012 नंतर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीमध्ये सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्ली विरुद्ध रेल्वे सामन्यासाठी तो उपलब्ध असेल. मानेच्या ताणामुळं कोहली 23 जानेवारीपासून सौराष्ट्र विरुद्ध दिल्लीच्या आगामी सामन्याला मुकणार आहे, परंतु संघाचा शेवटचा रणजी ट्रॉफी लीग सामना खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचं त्यानं दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला कळवलं आहे. दुसरीकडे रोहित शर्मानं चॅम्पियन्स ट्रॉफी संघाच्या घोषणेच्या वेळी स्पष्ट केलं होतं की तो 23 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीत खेळणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईचा संघ जाहीर झाला तेव्हा त्यात रोहितचं नाव होतं. तो जम्मू-काश्मीरविरुद्ध डावाची सुरुवात करेल. एकुणच रोहित 10 तर विराट 12 वर्षांनी रणजीमध्ये खेळताना दिसणार आहेत.
हेही वाचा :