जळगाव - जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2025
माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण…
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, "माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसंच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसंच नजीकच्या इतर खासगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आलं आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे."
जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2025
जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.#jalgaon pic.twitter.com/NHTUr1JTqw
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अपघातग्रस्तांच्या मदतीवर स्वतः नजर ठेवून आहेत. त्यांनी डावोसवरुन सर्व संबंधितांना सूचना दिल्या आहेत. तसंच त्यांनी मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये तर जखमींच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी सरकार घेत असल्याचं जाहीर केलं आहे.
या अपघातानंतर जखमींना जवळच्या दवाखान्यात हलवण्यात येत आहे. जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, "अपघातातील सहा ते सात प्रवासी आहेत त्यांना बंगळुरु कर्नाटक एक्सप्रेसने उडवलं आहे. या दुर्घटनेच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे." सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. जखमींना आम्ही तातडीने ग्रामीण रुग्णालयासह एकूण तीन रुग्णालयांमध्ये दाखल करतो आहोत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे. तसंज जळगावच्या सिव्हील हॉस्पीटलच्या डीनने ११ मृतदेह रुग्णालयात आणल्याचं तसंच ४० जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.
या अपघाताबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. सर्व यंत्रणा युद्ध पातळीवर कार्यरत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे पारधाडे रेल्वे स्थानकानजिक रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 22, 2025
जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून या अपघाताची माहिती घेतली. यावेळी जखमी प्रवाशांना…
दिल्लीतील रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार म्हणतात, "...काही प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमध्ये साखळी ओढली आणि ट्रेनमधून खाली उतरले. बेंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस दुसऱ्या बाजूने येत होती. आम्हाला काही प्रवाशांना धडक बसल्याने गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. अनेक लोक भुसावळहून ट्रेनमध्ये चढले होते आणि त्यापैकी एकाने अलार्म चेन ओढली. त्यानंतर, ते ट्रेनमधून खाली उतरले आणि चुकीच्या पद्धतीने रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला किंवा रुळांवर उभे होते. यामुळे त्यांना ट्रेनने धडक दिली. भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक घटनास्थळी रवाना झाले आहेत, वैद्यकीय पथक तेथे आहे, स्थानिक प्रशासन देखील तेथे आहे. रेल्वेचे वरिष्ठ विभाग अभियंता देखील तेथे आहेत. इतर वरिष्ठ डॉक्टर आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे..." ते पुढे म्हणाले, "आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ८-१० जणांना गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक रुग्णालये आणि इतर भागातून रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे, ते घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना रुग्णालयात नेले जात आहे."
#WATCH | Pushpak Express accident | Delhi: Information & Publicity Department of Railway Board, Executive Director, Dilip Kumar says, " ...a few passengers pulled alarm chain on pushpak express and deboarded the train. bengaluru-new delhi karnataka express was coming from the… pic.twitter.com/jBZ2wRs28X
— ANI (@ANI) January 22, 2025
रेल्वे मंत्र्यांची प्रतिक्रिया - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि इतर अधिकाऱ्यांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली आणि सर्व जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.