ETV Bharat / sitara

पूरग्रस्तांसाठी 'बिग बीं'ची ५१ लाखाची मदत - देवेंद्र फडणवीस

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पूरग्रस्तांसाठी ५१ लाखांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दल माहिती देत बिग बींचे आभार व्यक्त केले आहेत.

पूरग्रस्तांसाठी 'बिग बीं'ची ५१ लाखाची मदत
author img

By

Published : Aug 20, 2019, 3:07 PM IST

मुंबई - सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आता सरकार प्रयत्न करत आहे. सामाजिक स्तरातूनही अनेकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे सरसावला आहे. तर, कलाविश्वातूनही बरेच कलाकार आपली मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवत आहेत.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पूरग्रस्तांसाठी ५१ लाखांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दल माहिती देत बिग बींचे आभार व्यक्त केले आहेत.

  • Thank you Amitabh Bachchan ji for your gesture of coming forward & contributing ₹51,00,000 towards #CMReliefFund #MaharashtraFloods
    This will inspire many to help & contribute in our rehabilitation efforts for flood affected dists like Kolhapur, Sangli and Satara.@SrBachchan

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मराठी सिनेसृष्टीतीलही बऱ्याच कलाकारांनी पूरग्रस्तांची मदत केली आहे.

पूरग्रस्तांसाठी केंद्रसरकारकडून ६८१३ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यामधून सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी ४७०८ कोटी तर कोकण क्षेत्र, नाशिक आणि इतर पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी २१०५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

Intro:Body:Conclusion:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.