वाशिम : जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रावर सोयाबीन (Soybean) खरेदी सुरू होती. मात्र बारदानं संपल्यानं सोयाबीनची खरेदी थांबविण्यात आली आहे. पणन विभागाच्या दुर्लक्षाने उद्भवलेल्या या समस्येमुळं शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. बारदानांचा तुडवडा असल्यानं शेतकऱ्यांचा खोळंबा झाला आहे. तयामुळे बारदानं (पोती) कधी उपलब्ध होणार, याकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे.
केंद्रावरील बारदानं संपली : वाशिम तालुक्यातील नाफेडच्या राजगाव खरेदी केंद्रावर संत गजानन महाराज नाविण्यपूर्ण कृषी प्रक्रिया सहकारी संस्था, उमरा कापसे या संस्थेमार्फत सोयाबीनची हमीभावानुसार खरेदी प्रक्रिया सुरू होती. त्यासाठी ६ हजार शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली होती. तर २ हजार ५०० शेतकऱ्यांना आतापर्यंत मेसेज देखील देण्यात आला होता. अपेक्षित १ लाख क्विंटल सोयाबीनच्या तुलनेत २४ हजार क्विंटल सोयाबीनची हमीभावानुसार खरेदी करण्यात आली. मात्र गत काही दिवसापासून केंद्रावरील बारदानं संपली असून पणन विभागाने ही बारदानं उपलब्ध करून देण्याची गरज होती. मात्र, याकडं दुर्लक्ष करण्यात आल्यानं सोयाबीनची खरेदी थांबवण्यात आली आहे.
बारदानं कधी उपलब्ध होणार : नाफेड अंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदी केली जात होती. परंतु ऐनवेळी बारदानं संपल्यामुळे सोयाबीनची खरेदी थांबली आहे. आता बारदानं कधी उपलब्ध होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
पूर्ववत खरेदी सुरू व्हावी : येथील नाफेडच्या केंद्रावर सोयाबीनची खरेदी केली जात होती. मात्र गत काही दिवसापासून खरेदी बंद आहे. त्यामुळं पूर्ववत सोयाबीनची खरेदी सुरू व्हावी, अशी मागणी पोलीस पाटील विजय जाधव यांनी केली आहे.
सर्वच नाफेड केंद्रावरील सोयाबीन खरेदी बंद : राजगावसह इतर नाफेड केंद्रातील बारदानं संपली आहेत. त्यामुळं सोयाबीन खरेदी बंद आहे. मात्र वरिष्ठ स्तरावर बारदाना संदर्भात बोलणी झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळं लवकरच बारदानं उपलब्ध होतील, अशी माहिती आहे.
हेही वाचा -
- Guaranteed Price Of Paddy : छत्तीसगडमध्ये धानला हमीभाव देण्याची मोदींची गॅरंटी, मग महाराष्ट्राचं काय?
- सोयाबीनला 7 हजार दर देणार, महाराष्ट्राला उडता महाराष्ट्र होण्यापासून रोखणार, राजीव शुक्लांचं आश्वासन
- धानाच्या धर्तीवर सोयाबीनसह कापसाला अनुदान द्या; शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीनं मंजूर करा, भाजपा नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडं मागणी - BJP Leaders On Farmers Issues