ETV Bharat / sitara

प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांची जोडी ३६ वर्षांनी रंगमंचावर पुन्हा एकत्र - प्रशांत दामलेचे नवे नाटक

‘सारखं काहीतरी होतंय’ या नावाचं एक नवं कोर नाटकं प्रशांत दामलेने रंगभूमीवर आणलंय. यात त्याच्यासोबत आहे महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री वर्षा उसगांवकर. सध्या या नाटकाचे शुभारंभाचा प्रयोग सुरु आहेत.

प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर
प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर
author img

By

Published : Mar 30, 2022, 7:52 PM IST

कुठल्याही कलाकाराला अभिनय पक्का करायचा असेल तर नाटकाशिवाय पर्याय नाही. मनोरंजनसृष्टीला अनेक कलाकार याच माध्यमातून मिळालेले आहेत. परंतु काही मोठे कलाकार नाटकांमध्येच रमले त्यातील एक म्हणजे प्रशांत दामले. प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा हा अभिनेता त्यांच्यासाठी नवनवीन नाटकं घेऊन येत असतो. नाट्यरसिकही त्याच्या नाटकांना उत्तम प्रतिसाद देतात कारण त्याच नाणं नेहमी खणखणीत वाजत असते. आता प्रशांत दामलेने अजून एक नवं कोर नाटकं रंगभूमीवर आणलंय, ‘सारखं काहीतरी होतंय’ नावाचं ज्यात त्याच्यासोबत आहे महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री वर्षा उसगांवकर. सध्या या नाटकाचे शुभारंभाचा प्रयोग सुरु आहेत.

प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर
प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर
आपलं आयुष्य म्हणजे सुग्रास व्यंजनांनी भरलेलं ताट. त्यात प्रत्येक पदार्थाची जागा ठरलेली व प्रत्येक पदार्थाला आपली वेगळी चव असते. तशीच आपल्या हृदयात आपल्या माणसांची जागा ठरलेली असते व त्याचे स्थान वेगवेगळे असते. आपल्या नात्यांची, बदलत्या काळानुसार त्या नातेसंबंधांची परिभाषा बदलत असते. अशा बदलांना कधी प्रेमानं, कधी रागानं, कधी हक्कानं आपलंसं करायचं असतं. नात्यातल्या याच गोडव्याची आणि थोडया तिखटपणाची मजेशीर नोकझोक घेऊन गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित 'सारखं काहीतरी होतंय' रंगभूमीवर दाखल झालंय. प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांची ३६ वर्षांनी एकत्र आलेली सुपरहिट जोडी या नाटकात मध्यवर्ती भूमिकांत आहे. या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन संकर्षण कर्‍हाडेचे आहे.
प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर
प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर
दिग्दर्शकीय पदार्पणातच दोन दिग्गजांसोबत काम करण्याचा आनंद आणि नाटकाची धमाल मेजवानी याचं समाधान लेखक-दिग्दर्शक संकर्षण कर्‍हाडे याने व्यक्त केले. नात्यातील गमती-जमती, दोन पिढ्यांच्या विचारांतील विसंगती, करिअर आणि प्रेम यांचा सुरेख मिलाफ करत गुंफलेली कथा प्रत्येक घराची असून प्रत्येकजण या कथेशी एकरूप होईल, असा विश्वास निर्माते-अभिनेते प्रशांत दामले व्यक्त करतात. रुसवे-फुगवे यात नात्याची खरी मजा दडली आहे. आमच्या केमिस्ट्रीमधून हीच मजा प्रेक्षकांना घेता येईल, असं अभिनेत्री वर्षा उसगांवकर सांगतात.
प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर
प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर
‘सारखं काहीतरी होतंय’ ही घराघरातील गोष्ट आहे. घराघरात आईवडील आपल्या मुलांना मनापासून, स्वतःच्या आवडीनिवडी, परिस्थिती, त्रास सगळं बाजूला ठेऊन आनंदाच्या आणि सुखाच्या वातावरणात वाढवण्याचा प्रयत्न करत असतातच. पण मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचा आयुष्य जगण्याचा आणि आयुष्याकडे बघण्याच्या एक वेगळा दृष्टिकोन तयार झालेला असतो. जो दृष्टिकोन स्वाभाविकपणे आईवडिलांच्या दृष्टिकोनापेक्षा भिन्न असतो. ह्या भिन्नतेचा एकमेकांशी वागण्यावर आणि प्रामुख्याने आपापसातल्या संवादावर कायम परिणाम होत असतो. यावर उपाय म्हणून दोन्ही पिढ्या आपापल्या पद्धतीने आणि ‘पॉईंट ऑफ व्ह्यू’ ने मार्ग काढण्याच्या प्रयत्न करत असतात आणि घरात सारखं काहीतरी घडत असतं. नात्यातल्या गोडव्याची मजेशीर नोकझोक म्हणजे या नाटकाची गोष्ट.
प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांची जोडी ३६ वर्षांनी रंगमंचावर पुन्हा एकत्र

प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांच्यासोबत ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकात पूर्णिमा अहिरे-केंडे, सिद्धी घैसास, राजसिंह देशमुख आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत.

हेही वाचा - ‘चूल आणि मूल’ यात न अडकता शिक्षणाची कास धरलेल्या मुलीची कहाणी, ‘रिवणावायली'!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.