ETV Bharat / sitara

योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांचा 'वन फोर थ्री' आता प्रदर्शित होणार ४ मार्चला! - शारदा फिल्म्स प्रॉडक्शन

कोरोनामुळे अनेक चित्रपटांची प्रदर्शन-वेळापत्रकं (Film screenings) पुढेमागे झाली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे सध्या हिंदी चित्रपटांचं प्रदर्शन बंद असल्यामुळे पुढील काही आठवडे मराठी चित्रपटांना स्पर्धा (Competition for Marathi films) नसेल. त्यामुळेच बरेच मोठे मराठी चित्रपट फटाफट प्रदर्शित होताहेत. परंतु काही चित्रपटांचे प्रदर्शन पुढे गेले आहे. 'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' (sharda films production) निर्मित 'वन फोर थ्री' चित्रपट, जो ११ फेब्रुवारी ला प्रदर्शित होणार होता तो आता ४ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

one four three
वन फोर थ्री
author img

By

Published : Feb 13, 2022, 8:06 AM IST

मुंबई: योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांच्या प्रेमाची अनोखी केमिस्ट्री सांगणाऱ्या 'वन फोर थ्री' चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे ज्यात खलनायकांना टशन देण्यास अभिनेता वृशभ शहा प्रेक्षकांसमोर येत आहे.

अलीकडे सर्व काही रुळावर येऊ लागले असताना, पुन्हा एकदा कोरोनाने त्याचे स्वरूप बदलले आहे आणि त्यात ओमिक्रॉनमुळे पुन्हा नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईवर परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. रोमँटिक चित्रपटांच्या यादीत वन फोर थ्री चित्रपटाने आपले नाव नोंदवले असले तरी हा चित्रपट काहीसा लांबणीवर गेला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख नुकतीच समोर आली आहे. प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर घेऊन येणार 'वन फोर थ्री' हा खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट आहे.

चित्रपटाची नवी तारीख जाहीर करत चित्रपटाचे दिग्दर्शक याबाबत असे म्हणतात की, 'जगभरात कोरोनाची तिसरी लाट आणि ओमिक्रॉनची भीती यामुळे नववर्षात पुन्हा एकदा संकट येऊन उभे राहिले आहे. वन फोर थ्री चित्रपट हा प्रेमाचे फंडे देणारा असल्याने हा चित्रपट प्रेमाच्या महिन्यात म्हणजेच व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधत प्रदर्शित करण्याचे आयोजले होते मात्र कोरोना आणि ओमिक्रॉनच्या नव्या संकटामुळे ११ फेब्रुवारी ऐवजी हा चित्रपट ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अचानक उद्धवलेल्या या संकटामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यास काही दिवस वाट पाहावी लागणार आहे'.

या चित्रपटात अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. तर अभिनेता वृषभ शहा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत दमदार असे पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. तर नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार हे या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची भूमिका बजावत आहेत. विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाकरिता काम केले आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे. चित्रपट प्रदर्शनात वितरकाचीही मुख्य भूमिका असते, या चित्रपटात अनिल थडाणी यांनी वितरकाची भूमिका अगदी योग्यरित्या निभावली आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट असून बॉलिवूडने देखील या चित्रपटाची दखल घेतली होती, इतकेच नव्हे तर करेन तर मामाचीच, हे आपलं काळीज हाय या टॅगलाईनसुद्धा प्रेक्षकांकडून सतत ऐकायला मिळत होत्या मात्र हा चित्रपट ११ फेब्रुवारी ऐवजी ४ मार्चला प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.