ETV Bharat / entertainment

शिवजयंतीनिमित्त विकी कौशल जाईल रायगड किल्ल्यावर, व्हिडिओ व्हायरल... - VICKY KAUSHAL VISIT RAIGAD

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा आज शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी जात आहे.

vicky kaushal
विकी कौशल ('छावा'नं रचला इतिहास ('Chhaava' trailer screen grab))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 19, 2025, 12:43 PM IST

मुंबई - अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये त्यानं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. 'छावा' चित्रपटामध्ये त्यानं जबरदस्त अभिनय केला आहे, त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ विकी कौशल 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्याला भेट देणार असल्याचं सांगताना दिसत आहे. हा व्हिडिओ विकीनं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. 19 फेब्रुवारी रोजी देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तसेच स्वराज्याची राजधानी रायगड येथेही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत.

विकी कौशल शिवजयंतीनिमित्त जाईल रायगड किल्ल्यावर : आता बॉलिवूड अभिनेता विकी कौशल देखील छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी रायगडलाल जात आहे. शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्याला भेट देऊन विकी हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेणार आहे. तसेच शिवभक्तांसह अनेक मान्यवर येथे शिवजयंतीनिमित्त या कार्यक्रमात सामील होणार आहेत. यावर्षी बॉलिवूड अभिनेता विकी कौशल देखील छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी रायगडला जात असल्यानं त्याचे चाहते आता खुश झाले आहेत. आजचा दिवस शिवभक्तांसाठी खूप विशेष आहे. तसेच आज या विशेष दिवशी ढोल-ताशांच्या गजरात रायगडवर मिरवणुका काढली जाणार आहे.

विकी कौशल स्टारर 'छावा' चित्रपट : 'छावा' रिलीज झाल्यानंतर विकी कौशल हा अनेक ठिकाणी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जाताना दिसत आहे. सध्या 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप जबरदस्त कमाई करत आहे. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता. या चित्रपटानं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर एकूण 165.75 कोटीचं कलेक्शन केलं आहे. या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, आशुतोष राणा, अक्षय खन्ना, आलोक नाथ, दिव्या दत्ता, प्रदीप रावत, विनीत कुमार सिंग आणि डायना पेंटी हे कलाकार दिसले आहेत.

हेही वाचा :

  1. नागपूर थिएटरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशात 'छावा' पाहण्यासाठी पोहोचला चाहता, व्हिडिओ व्हायरल...
  2. विकी कौशलच्या 'छावा'नं बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या चौथ्या दिवशी केली धमाकेदार कमाई...
  3. 'छावा' चित्रपट पाहाताना रडणाऱ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल, विकी कौशलनही केला शेअर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.