ETV Bharat / sitara

'83' पाहून रजनीकांत प्रभावित, केले संपूर्ण टीमचे अभिनंदन!! - 83 फिल्म रिव्ह्यू

रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला कबीर खान दिग्दर्शित 83 चित्रपटाने रजनीकांतला प्रभावित केले आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील विश्वचषक 1983 जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या विजयावर आधारित 'भव्य' चित्रपट दिल्याबद्दल या सुपरस्टारने टीमचे कौतुक केले आहे.

रजनीकांतने 83 चे कौतुक केले
रजनीकांतने 83 चे कौतुक केले
author img

By

Published : Dec 28, 2021, 7:42 PM IST

चेन्नई (तामिळनाडू) - 1983 च्या विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या विजयाचा प्रवास दाखवणारा 83 हा भव्य चित्रपट पाहून देशभरातील अनेक दिग्गज प्रभावित झाले आहेत आता या यादीमध्ये सुपरस्टार रजनीकांतचाही समावेश झाला आहे.

रजनीकांत यांनी ट्विटरवर चित्रपटाबद्दल आपले मत शेअर केले. त्यांनी लिहिलंय, "#83TheMovie wow what a movie… शानदार!!! निर्मात्यांचे खूप अभिनंदन."

सुपरस्टार रजनीकांत यांनी दिग्दर्शक कबीर खान, क्रिकेट आयकॉन कपिल देव, अभिनेता रणवीर सिंग आणि चित्रपटात क्रिकेटर श्रीकांतची भूमिका करणारा तमिळ अभिनेता जिवा यांनाही टॅग केले आहे.

याशिवाय, रजनीकांत यांनी चित्रपटाच्या संपूर्ण कलाकार आणि क्रूचे अभिनंदन केले. या चित्रपटाला चाहते आणि समीक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

कमल हसनच्या राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल आणि अक्किनेनी नागार्जुनच्या अन्नपूर्णा स्टुडिओने रिलायन्स एंटरटेनमेंटशी हातमिळवणी केली आहे. यामुळे हा चित्रपट तेलुगु आणि तमिळ भाषेत रिलीज झाला आहे.

पृथ्वीराज निर्मिती संस्था आणि किच्चा सुदीपच्या शालिनी आर्ट्सने चित्रपटाच्या मल्याळम आणि कन्नड भाषेतील आवृत्ती सादर केल्या आहेत.

हेही वाचा - दिशा पटानी आणि टायगर श्रॉफच्या मालदीवमधील फोटोंनी चाहत्यांना वेड लावले

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.