ETV Bharat / entertainment

बॉलिवूडमधील काही लोक प्रतिभा चिरडतात, विवेक ओबेरॉयचा हल्ला बोल - विवेक ओबेरॉय आगामी चित्रपट

विवेक ओबेरॉयने त्याच्या कारकिर्दीतील काही यशस्वी चित्रपटांनंतर त्याला कोणत्या परिस्थितीतून जावे लागले यावर आपले भाष्य केले आहे. विवेकने असे मत व्यक्त केले की एका विशिष्ट लॉबीने त्याच्या प्रतिभेला चिरडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला आशा आहे की आता ही व्यवस्था कमी होत आहे.

विवेक ओबेरॉयचा हल्ला बोल
विवेक ओबेरॉयचा हल्ला बोल
author img

By

Published : Dec 16, 2022, 12:18 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयला बॉलिवूडमध्ये त्याच्या विरोधात लॉबीने काम केल्यानंतर त्याला संधींची कमतरता जाणवली. अभिनेत्याने सांगितले की तो प्रेक्षक आणि समीक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाला होता,परंतु त्यावेळेस कोणीही त्याच्याबरोबर काम करण्यास तयार नव्हते म्हणून ऑफरमध्ये यशाचे परिवर्तन झाले नाही. पण आता त्याच्यासाठी दृश्य बदलत आहे, असं विवेक म्हणाला.

एका वेबलॉइडशी बोलताना, विवेकने काही यशस्वी चित्रपटांनंतर त्याच्या कारकिर्दीतील निरुत्साही अवस्थेनंतर त्याला कोणत्या परिस्थितीतून जावे लागले याबद्दल आपले मत व्यक्त केले. विवेकने सांगितले की, एका विशिष्ट लॉबीने त्याच्या प्रतिभेला चिरडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला आशा आहे की आता ही व्यवस्था कमी होत आहे.

"हे तुटत आहे. बघा सुशांत सिंग राजपूत कशातून गेला किंवा इतर कितीतरी मुलं जातात, इतकी प्रतिभा चिरडली जाते कारण हा कोणाला तरी संपवण्यासाठी कामाशिवायचा कोणाचा तरी निर्णय असतो. काही लोकांच्या हातात खूप मोठी शक्ती आहे. इथे गॉड कॉप्लेक्सही आहे जिथे जाण्याची गरज आहे.," असे विवेक म्हणाला.

46 वर्षीय अभिनेता विवेक ऑबेरॉयने पुढे सांगितले की, "इतकी शक्ती आपण त्यांच्या हातात दिली नाही पाहिजे की ज्यातून ते कोणाला तरी बनवू शकतील किंवा तोडू शकतील. अशा प्रकारचे लोक या उद्योगात असणार नाहीत याची तजवीज करा. लोकांनी मला हे सांगितले आणि लोक यावर विश्वास ठेवतात. अशा प्रकारची शक्ती त्यांना बहाल झालीय ही आपलीच चूक आहे. नवीन असो की जुने, नवोदित असो की प्रस्थापित फक्त प्रतिभेलाच संधी मिळाली पाहिजे.''

विवेक पुढे रोहित शेट्टीच्या ओटीटी डेब्यू सीरिज इंडिया पोलिस फोर्समध्ये दिसणार आहे. कंपनी, दम, साथिया, युवा आणि शूटआउट अॅट लोखंडवाला यासारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखला जाणारा विवेक ओबेरॉय, इनसाइड एज या दुसर्‍या प्राइम व्हिडिओ मालिकेत देखील काम करत आहे. रोहित शेट्टी पिक्चर्सच्या सहकार्याने इंडियन पोलिस फोर्स या अॅमेझॉन ओरिजिनल मालिकेचे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. हा शो पुढच्या वर्षी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - 'गोविंदा नाम मेरा'च्या गाण्यावर थिरकली युगांडाची पोरं, कियारा अडवाणी म्हणाली 'लय भारी'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.