मुंबई : आज, 19 फेब्रुवारी रोजी, देशात छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती साजरी केली जात आहे. आज या विशेष दिवशी 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज'च्या निर्मात्यांनी मराठा किंग यांचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. या पोस्टरद्वारे महान मराठा योद्ध्याची शक्ती, भक्ती आणि शौर्य दर्शविले गेले आहे. बुधवारी, शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, चित्रपट निर्माते संदीप सिंग यांनी 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करून शिवभक्तांना खुश केलं आहे. या पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज' हे भवानी देवीच्या समोर उभे असल्याचे दिसत आहे.
'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज'मधील फर्स्ट लूक रिलीज : या पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा चेहरा गुप्त ठेवण्यात आला आहे. पोस्टरमध्ये आध्यात्मिक ऊर्जा आणि ऐतिहासिक भव्यता स्पष्टपणे दिसून येत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करताना संदीप सिंगनं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव भारताचे अभिमान, महान योद्धा, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त, संपूर्ण खंडाचे नशीब बदलणाऱ्या महान राजाच्या शक्ती आणि भक्तीचे दर्शन घडवणारा फर्स्ट लूक आम्ही अभिमानाने सादर करत आहोत. एका सर्वोत्तम टीमबरोबर त्यांच्या शौर्याची आणि स्वराज्याची महान गाथा प्रत्यक्षात आणणं हा आमच्यासाठी एक सर्वात मोठा सन्मान आहे. हा चित्रपट 21 जानेवारी 2027 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.'
'द प्राइड ऑफ इंडिया: छत्रपती शिवाजी महाराज'ची टीम : 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज'च्या टीममध्ये काही सेलिब्रिटी सामील झाले आहेत. सिद्धार्थ-गरिमा (कथा, पटकथा आणि संवाद), प्रतीम (संगीत दिग्दर्शक), प्रसून जोशी (गीतकार), रवी वर्मन (फोटोग्राफी डायरेक्टर) आणि रेसूल पुकुट्टी (साउंड डायरेक्टर). या चित्रपटामध्ये 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' हा चित्रपट हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली भाषेत बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :