सोलापूर - अफगाणिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीवर सोलापुरातील सुप्रसिद्ध चित्रकार सचिन खरात यांनी बोलकी कलाकृती साकारली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने प्रवेश केल्यापासून वातावरण तणावपूर्ण झाले आहे. अनेक नागरिक पलायन देखील करत आहेत. विमानात जागा न मिळाल्याने काही प्रवाशी विमानाच्या पंख्यावर बसून देखील बसून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या लोकांनी पुढे जायचं कुठे, राहायचं कुठे आणि जगणार कसे असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. चित्रकार म्हणून या सगळे प्रश्न चित्राच्या रुपात मांडत असल्याची भावना चित्रकार सचिन खरात यांनी केली.
युद्ध नको शांतता हवी
अफगाणिस्तान देशात अमेरिकन सैन्याने माघार घेतल्याने काही दिवसांत तालिबानी लढव्ये संपूर्ण देशात कब्जा करून विराजमान झाले आहेत. पुन्हा एकदा तालिबानी राजवट येत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने ,काबुल विमानतळावर अफगाणी नागरिक विमानासमोर सैरावैरा धावत आहेत. विमानात जागा मिळत नसल्याने काही नागरिक विमानाच्या बाहेर बसले आहेत.याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जगातील अनेक नागरिकांना व्हिडीओ पाहून वेदना झाल्या.हे सर्व चित्र रेखाटत असताना सचिन खरात यांनी युद्ध नको ,शांतता हवी असा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
हे अफगाण लोक जाणार कुठे
वर्षभरापासून जगात कोरोना महामारीने थैमान मांडले आहे.जगातील प्रत्येक देश हा कोरोना विषाणूने संक्रमित झाला आहे. या महामारीच्यावेळी अफगाण नागरिक आणि जगातील नागरिक सरसावत आहेत.पण कोरोना महामारीचं संकट अजून गेलेले नाही. त्यांच्यावर सत्तांतरच संकट ओढवले आहे.आपला जीव मुठीत धरून जगण्याची वेळ त्यांवर आली आहे,बंदुकीची गोळी कुठून येईल आणि आपला जीव जाईल अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा - नांदेडमधील 'मराठा मूक आंदोलन' भाजपा प्रणित - अशोक चव्हाण