पुणे : सोशल मीडियाच्या युगात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे गुन्हे घडत आहेत. पुण्यात तर एक गुन्हेगार हा ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनवर नजर ठेवून होता. ज्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन होते, त्यादिवशी हा गुन्हेगार हातचालाखीनं एटीएम कार्डची अदलाबदल करुन त्यांच्या एटीएममधून पैसे काढत होता. या गुन्हेगारानं आत्तापर्यंत २१ ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली आहे. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये १६ गुन्हे दाखल आहेत. तर त्याच्याकडून एकूण १३,९०,७००/- रुपयांचा मुदेमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती, पोलीस उपआयुक्त संदीपसिंह गिल यांनी दिली.
ATM कार्डची केली अदलाबदल : या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी राजु प्रल्हाद कुलकर्णीला (वय ५४ वर्षे) अटक केली आहे. याबाबत पोलीस उपआयुक्त संदिपसिंह गिल म्हणाले की, दोन फेब्रुवारी रोजी पुण्यातील नवी पेठ येथे सायंकाळच्या सुमारास महाराष्ट्र बँकेच्या एटीएमजवळ आरोपीनं एका ज्येष्ठ नागरिकाला पैसे काढण्याच्या मदतीच्या बहाण्यानं त्यांचं एटीएम कार्ड स्वतःकडं घेतलं आणि दुसरं एटीएम कार्ड दिलं. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या एटीएममधून ज्येष्ठ नागरिकाच्या एटीएम कार्डने एकूण २२,००० रुपये काढले. याबाबतची तक्रार विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती.
बँकेची एकूण १६६ एटीएम कार्ड : आरोपीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात वेगवेगळ्या बँकेची एकूण १६६ एटीएम कार्ड मिळून आली. आरोपीकडं अधिक चौकशी केली असता आरोपीनं पुणे शहर पोलीस आयुक्तालय आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातच्या अंतर्गत जेथे पेन्शनची रक्कम काढणारे ज्येष्ठ नागरिक येतात, अशा एटीएम मशीन समोर आरोपी थांबून राहायचा. तो ज्या ज्येष्ठ नागरिकांना एटीएममधून पैसे काढता येत नाहीत अशांना मदत करण्याचं भासवून त्यांच्याकडून एटीएम कार्डचा पिन नंबर आणि एटीएम कार्ड घेत होता. त्यानंतर हातचालाखीनं दुसरं एटीएम कार्ड बदलून एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर सदरचा एटीएम पिन मॅच होत नाही बँकेत जाऊन चौकशी करा असं तो ज्येष्ठ नागरिकांना सांगत होता. नंतर तो दुसऱ्या एटीएम मशीनमधून पैसे काढत होता. अशा प्रकारे अनेक शहरातील २१ ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस उपआयुक्त संदीपसिंह गिल यांनी दिली.
हेही वाचा -
- दोन बँकांची एटीएम फोडून चोरट्यांनी लंपास केली १७ लाखांची रोकड, घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद
- चोरट्यांनी अगोदर कॅमेऱ्यावर मारला स्प्रे, मग १९ लाख रोकड असलेली एटीएम मशीनच पळवली - ATM Machine Theft Case
- महादेव बेटिंग ॲपचं बीड कनेक्शन; आरोपींकडून 150 एटीएम कार्ड, 67 बँक पासबुक आणि एवढे सिमकार्ड जप्त - Mahadev Betting App Exposed