मुंबई - कन्नड चित्रपटाचा स्टार अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी संदीप सिंग दिग्दर्शित 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत. २१ जानेवारी २०२७ रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शनाची तयारी सुरू असलेल्या या भव्य चित्रपटासाठी भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वोत्तम टीम तयार करण्यात आली आहे. या चित्रपटासाठी गीतकार प्रसून जोशी आणि संगीतकार प्रीतम पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. ऋषभ शेट्टी देखील स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी उत्सुक झाला आहे. या चित्रपटासाठी सिद्धार्थ आणि गरीमा यांची जोडी कथा, पटकथा आणि संवाद लिहिणार आहेत. रवी वर्मान या चित्रपटाचं छायाकन करणार आहेत तर रसूल पोकुट्टी ध्वनीमुद्रण करतील.
RISHAB SHETTY IN & AS 'CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ': SANDEEP SINGH SIGNS PRITAM - PRASOON JOSHI FOR THE FILM... Lyricist #PrasoonJoshi and music composer #Pritam will collaborate for the first time on #ThePrideOfBharat: #ChhatrapatiShivajiMaharaj.
— taran adarsh (@taran_adarsh) February 17, 2025
Directed by #SandeepSingh, the… pic.twitter.com/lgYo4QWB4s
छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनत असल्यामुळे तो भव्य असायला हवा यावर निर्माता संदिप सिंग यांनी भर दिला आहे. महाराजांच्या भूमिकेसाठी ऋषभ शेट्टी सर्वोत्तम पर्याय होता असं संदिप यांनी म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद, आत्मा आणि शौर्य दाखवण्याचं सामर्थ्य या कलाकारात असल्याचा विश्वास या निमित्तानं त्यांनी व्यक्त केलाय.
RISHAB SHETTY IN & AS 'CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ': POWERHOUSE TEAM ANNOUNCED... #SandeepSingh has announced a powerhouse team for #ThePrideOfBharat: #ChhatrapatiShivajiMaharaj - bringing together the best from every field.
— taran adarsh (@taran_adarsh) February 18, 2025
The team includes #SiddharthGarima [screenwriting],… pic.twitter.com/wPbVXFZeP9
ऋषभ शेट्टी यानं स्वतः या चित्रपटाबद्दलचा उत्साह व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना एक राष्ट्रीय नायक म्हणून स्वीकारत, त्यांचा प्रभाव इतिहासाच्या पलीकडचा असल्याचं त्यानं म्हटलंय. सोशल मीडिया पोस्टमध्ये ऋषभनं लिहिले आहे, "भारताच्या महान योद्ध महाकाव्य गाथा सादर करताना आम्हाला हा एक सन्मान आणि विशेषाधिकार वाटत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा फक्त एक चित्रपट नाही तर हा एका सर्व अडचणींविरुद्ध लढलेल्या योद्ध्याचा सन्मान करण्यासाठीचं एक युद्धगीत आहे. त्यांनी मुघल साम्राज्याच्या सामर्थ्याला आव्हान दिलं आणि कधीही विसरता येणार नाही असा वारसा निर्माण केला. संपूर्ण भारतवासीयांचे अभिमान छत्रपती शिवाजी महाराज", असं ऋषभ शेट्टीनं आदरपूर्वक लिहिलं आहे.
Our Honour & Privilege, Presenting the Epic Saga of India’s Greatest Warrior King – The Pride of Bharat: #ChhatrapatiShivajiMaharaj. #ThePrideOfBharatChhatrapatiShivajiMaharaj
— Rishab Shetty (@shetty_rishab) December 3, 2024
This isn’t just a film – it’s a battle cry to honor a warrior who fought against all odds, challenged… pic.twitter.com/CeXO2K9H9Q
कामाच्या आघाडीवर ऋषभ शेट्टी - सध्या ऋषभ शेट्टी त्याच्या आगामी 'कंतारा २' या चित्रपटाच्या कामात खूपच अडकला आहे. हा चित्रपट यंदा 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्तानं रिलीज होणार आहे. याशिवाय ऋषभ प्रशांत वर्माच्या 'जय हनुमान' या चित्रपटात भगवान हनुमानाची मुख्य भूमिका साकारत आहे.
हेही वाचा -