मुंबई: बसमधील गर्दीचा फायदा घेत (Taking advantage of the crowd ) प्रवाशांचा खिसा कापून मोबाईल आणि मौल्यवान वस्ती चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा १२ ला यश आले आहे. १७ ऑक्टोबर रोजी पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली असून आरोपींकडून पाच मोबाईल आणि खिसे कापण्यासाठी वापरण्यात येणारे कट्टर देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही टोळी बोरिवली पूर्वेकडील ओंकारेश्वर मंदिर बस स्टॉप वर बससाठी गर्दी झाल्यानंतर प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारून मोबाईल आणि मौल्यवान वस्तू गायब करत असे गुन्हे शाखा बाराने सापळा रचून पाचही आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. अशी माहिती पुलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिली आहे.
आरोपींवर भादवी ४०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमधे राजाराम रामदास पाटील (४०) यांच्यावर यापूर्वी १३ गुन्हे, अब्दुल कादर शाह छोटा अब्दुल (५०) दाखल गुन्हे 3, मोहम्मद रफीक वकील शेख (४४) ४ गुन्हे दाखल, संजय प्रभाकर त्रिंबके (४५) ११ गुन्हे दाखल, महादेव वसंत माने (३५) ९ गुन्हे दाखल आहेत.