ETV Bharat / city

Sanjay Shirsat : मुख्यमंत्र्यांकडून लीलावती रुग्णालयात आमदार शिरसाटांच्या प्रकृतीची विचारपूस; रमेश केरेंचीही घेतली भेट - रमेश केरेंचीही घेतली भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी बुधवारी आमदार संजय शिरसाट ( MLA Sanjay Shirsat ) यांची लीलावती रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली. शिरसाट यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने काल औरंगाबादहून मुंबईत आणण्यात आले होते.

Sanjay Shirsat
आमदार शिरसाटांच्या प्रकृतीची विचारपूस
author img

By

Published : Oct 19, 2022, 2:13 PM IST

मुंबई : हृदयविकाराचा झटका आल्याने आमदार संजय शिरसाट ( MLA Sanjay Shirsat ) यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर अँजोप्लास्टी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी आज लीलावती रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, तब्येतीची काळजी घेण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर जे जे रुग्णालयात जाऊन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील ( Ramesh Kere Patil ) यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्या प्रकृतीचीही मुख्यमंत्र्यांनी जाऊन विचारपूस केली.

मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल : औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना सोमवारी रात्री हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्यांच्यावरील अधिकच्या उपचारासाठी त्यांना सोमवारी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया करून एक स्टेन टाकण्यात आली आहे. आज मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता लीलावती रुग्णालयात जाऊन चौकशी केली. तसेच प्रकृतीची अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला. डॉ. जलील परकार यांच्या देखरेखीखाली शिरसाट यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांचीही माहिती घेतली. दरम्यान, अँजिओप्लास्टी नंतर त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरात लवकर त्यांनी पूर्ण बरे होऊन पुन्हा राजकीय जीवनात सक्रिय व्हावे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी आमदार शिरसाट याना दिला आहे.

रमेश केरे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी विषप्रशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी सर जे जे रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. आता त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निगराणीखाली पुढील उपचार सुरू आहेत. पुन्हा त्यांनी असे धाडस करू नये असा सल्ला देखील त्यांनी केरे पाटील यांना यावेळी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.