मुंबई- शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांच्या पत्नी वर्षा राऊत ( Varsha Raut ) यांची आज 9 तास चौकशी केल्यानंतर ईडी ( Varsha Raut ED Inquiry ) कार्यातून बाहेर पडल्या आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणांमध्ये वर्षा राऊत यांची आज चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात ईडीने यापूर्वी संजय राऊत यांना अटक ( Sanjay Raut arrested by ED ) केली असून 8 ऑगस्टपर्यंत ईडी कस्टडीमध्ये आहे.
ईडीकडून चौकशी - वर्षा राऊत यांची आज ईडी कडून चौकशी ( Varsha Raut's interrogation by ED today ) करण्यात आली. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वकील देखील होते. आज झालेल्या चौकशी दरम्यान संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची सुमारासमोर देखील चौकशी करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आणखी उद्याला काही लोकांना ईडीने समन्स देऊन बोलवले असून त्यांची देखील संजय राऊत यांच्या समोरासमोर चौकशी करण्यात येणार असले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
वर्षा राऊतांच्या बँक खात्यात 55 लाखांची रक्कम - ईडीला मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यामध्ये 55 लाख रुपयाची रक्कम बिना व्याज देण्यात आली होती यासंदर्भातील आरोप झाल्यानंतर वर्षा राऊत यांनी ही रक्कम परत देखील केले होते. संजय राऊत यांच्या सुरू असलेल्या पत्राचाळ घोटाळ्यासंदर्भातील माहिती देखील आज झालेल्या चौकशी दरम्यान विचारण्यात आली असल्याचे देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ईडी कडून न्यायालयात युक्तिवादा दरम्यान वकिलांनी अशी माहिती दिली होती की संजय राऊत यांची कस्टडी देण्यात यावी तपासाकरिता आम्ही आणखी काही लोकांना समन्स बजावले आहे त्यामुळे संजय राऊत आणि इतर व्यक्तींना समन्स बजावण्यात आला आहे त्यांची समोर चौकशी करणे आवश्यक असल्याने कस्टडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
वर्षा राऊत यांच्या अडचणीत वाढ - मनी लाँडरिंगप्रकरणी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना समन्स पाठवल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वर्षा यांच्या बँक खात्यातून अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यात आले आहेत. वर्षा राऊत यांच्या बँकेतून 1 कोटी 6 लाख आणि 1 कोटी 8 लाख अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत आणि वर्ष राऊत यांची चौकशी करण्यासाठी ईडीने वर्ष राऊत यांना समन्स पाठवले आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून अनेक व्यवहार झाले असून त्याबाबत ईडीला वर्षा यांची चौकशी करायची आहे.
काय आहे पत्राचाळ घोटाळा? मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य आठ बिल्डरांना 1,034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत.
वर्षा यांना 83 लाखांचे कर्ज - ईडीने प्रवीणला पकडले तेव्हा संजय राऊतचे नाव समोर आले. प्रवीण हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मित्र आहे. प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. तपास सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीला 55 लाख रुपये परत केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचाही संजय राऊतशी संबंध आहे. सुजित हा संजय यांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली होती.
हेही वाचा - Jagdeep Dhankhar Wins : जगदीप धनखड़ भारताचे नवे उपराष्ट्रपती.. मार्गारेट अल्वा यांचा पराभव