ETV Bharat / state

सत्यम...सत्यम...दीड्डम...दीड्डम..! 900 वर्षांची परंपरा असलेल्या सिद्धेश्वर महायात्रेला सुरुवात, अक्षता सोहळा संपन्न - SIDDHESHWAR YATRA 2025

सोलापुरात सिद्धेश्वर तलावाकाठी संमती कट्ट्यावर कुंभार कन्येचा अक्षता सोहळा संपन्न झाला. (Siddheshwar Yatra 2025) या अक्षता सोहळ्याला 900 वर्षांची परंपरा आहे.

Siddheshwar Yatra In Solapur
अक्षता सोहळा (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2025, 8:20 PM IST

Updated : Jan 13, 2025, 9:29 PM IST

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची सिद्धेश्वर महायात्रा (Siddheshwar Yatra 2025) यन्नीमज्जन, तैलाभिषेक सोहळ्यानं सुरू झाली आहे. आशियातील सर्वात मोठी आणि सर्वात प्राचीन महायात्रा म्हणून सिद्धेश्वर यात्रेकडं पाहिलं जातं. सोमवारी सकाळी ८ वाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्याहस्ते पूजा झाली. पूजा झाल्यानंतर नगर प्रदिक्षणेस सुरुवात झाली. यावेळी सिध्देश्वर प्रशालेसमोर कलेक्टर कचेरीच्या जुन्या फाटकाजवळ सरकारतर्फे आहेर करण्यात आला.

एक हजार वर्षांपासून सिद्धेश्वर महायात्रा : सिद्धेश्वर महायात्रेत नंदीध्वजाना मानाचं स्थान आहे. मानाचे सातही नंदी ध्वज सोलापुरातील पारंपरिक मार्गावरुन सिद्धेश्वर मंदिरासमोर असलेल्या संमती कट्ट्यावर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंडाचा कुंभार कन्येशी बाराव्या शतकांमध्ये विवाह झाल्याची आख्यायिका आहे. त्याच श्रद्धेनं सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेत मागील एक हजार वर्षांपासून प्रतीकात्मक अक्षता सोहळ्याची परंपरा सुरू आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पालिका आयुक्त शीतल तेली उगले, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपा आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी आदींच्या उपस्थितीत मानकऱ्यांनी अक्षता सोहळा संपन्न झाला.

सिद्धेश्वरांचा आणि कुंभार कन्येचा अक्षता सोहळा (ETV Bharat Reporter)

लिंगागी अर्थात योग असलेले सिद्धेश्वर महाराजांची कथा : ग्राम दैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या कुटीबाहेर एक कुंभाराची कन्या दररोज सकाळी सडा मारून रांगोळी काढत असे. ही गोष्ट सिद्धेश्वर महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या कुंभार कन्येला तिची अपेक्षा विचारली असता, तिनं सिद्धेश्वरांशी विवाह करू इच्छित असल्याचं सांगितलं. तेव्हा सिद्धेश्वरांनी अत्यंत नम्रपणे आपण लिंगागी असल्यानं विवाह करू शकत नसल्याचं सांगितलं. मात्र, तरीही कुंभार कन्येनं हट्ट केल्यावर त्यांनी तिला आपल्या योगदंडाशी विवाह करण्याचा सल्ला दिला. त्याच विवाहाचं प्रतीक म्हणून सोलापुरात मकर संक्रांतीला हा विवाह सोहळा संपन्न होतो, अशी आख्यायिका आहे. त्याला अक्षता सोहळा म्हणतात. या विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी ती कुंभार कन्या सती जाते, अशी अख्यायिका आहे. त्यामुळं मंगळवारी सोलापुरातल्या होम मैदानावर होमविधी पार पाडतो.

प्रमुख विधी होतात संपन्न : ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या महायात्रेत हळदी, विवाह आणि होमहवन हे तीन प्रमुख विधी आहेत. होम म्हणजे प्रेमासाठी सती जाणे ही त्यागाची गोष्ट घडलेली असल्याचं सांगितलं जातं. या घटनेला सर्व समाज साक्षीदार असल्यानं या यात्रेत ७ समाजाच्या मानाच्या ७ काठ्या निघतात. भाविक मोठ्या श्रद्धेनं या महायात्रेला हजेरी लावतात. आशिया खंडातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून या यात्रेचा उल्लेख होतो. सिद्धेश्वर महायात्रा ही यात्रा आजपासून एक महिनाभर चालते.

सुगडी पूजेला अनन्यसाधारण महत्व : सोलापूर शहरातील दत्त चौक, माणिक चौक, विजापूर वेस, जिल्हाधिकारी कार्यालया समोरुन ही मिरवणूक सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या संमती कट्ट्यावर पोहोचली. या ठिकाणी सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाच्या साक्षीनं सुगडी पूजा करण्यात आली. महायात्रेचे मानकरी कुंभार यांना हिरेहब्बू यांच्याहस्ते विडा दिला गेला. त्यानंतर संमती कट्ट्यावर सर्व मानकरी आल्यानंतर श्री तम्मा शेटे यांनी संमती (अक्षता) वाचन केली. हा अभूतपूर्व असा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते.

महाराष्ट्र , आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील भाविक दाखल : नंदीध्वज नगर प्रदक्षिणेसह तैलाभिषेक सोहळा पार पडला. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला जवळपास 900 वर्षांची परंपरा आहे. यात्रेला केवळ सोलापूरच नाही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून देखील भाविक येत असतात. श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही सोलापूरमध्ये 'गड्डा यात्रा' म्हणून ओळखली जाते.

हेही वाचा -

  1. लातुरच्या सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात.. पंधरा दिवस कार्यक्रमांची मेजवानी
  2. काही दिवसांवर आलेल्या सिद्धेश्वर यात्रेचा पेच सुटेना, होताहेत फक्त बैठका
  3. महिनाभर चालणारी सिद्धेश्वर यात्रा केवळ चार दिवसांची

Last Updated : Jan 13, 2025, 9:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.