ETV Bharat / briefs

माझा नाद करू नका, मला संजय शिंदे म्हणतात; चंद्रकांत पाटलांच्या धमकीला शिंदेंचे प्रत्युत्तर - solapur

शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज मागे घेण्याची अजूनही वेळ गेली नाही. असे म्हणत त्यांच्या तीन प्रकरणाची लवकरच चौकशी करण्यात येईल, असा धमकीवजा इशारा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरच्या सभेमध्ये दिला होता.

संजय शिंदे
author img

By

Published : Apr 6, 2019, 2:15 PM IST

सोलापूर - माझा नाद करू नका, मला संजय शिंदे म्हणतात. अशा शब्दात माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना थेट आव्हान दिले आहे. अकलूजमधील सभेत ते बोलत होते.

अकलूजमध्ये बोलताना संजय शिंदे

शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज मागे घेण्याची अजूनही वेळ गेली नाही. असे म्हणत त्यांच्या तीन प्रकरणाची लवकरच चौकशी करण्यात येईल, असा धमकीवजा इशारा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरच्या सभेमध्ये दिला होता.

माढा लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून संजय शिंदे यांनी निवडणूक लढवावी यासाठी भाजपाने खूप प्रयत्न केले होते. सुरूवातीपासून संजय शिंदे यांनी मी लोकसभेसाठी इच्छून नाही. मला करमाळा विधानसभा निवडणूक लढवायची आहे असे सांगत भाजपाला माढ्यातून लढण्यास नकार दिला होता. मात्र ऐनवेळी विजयसिंह मोहिते पाटील भाजपामध्ये गेल्यामुळे संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढ्यातून उमेदवारी स्वीकारली. यामूळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे चांगलेच खवळले आहेत. संजय शिंदे यांची चौकशी लावू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला होता.

संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढ्यातून उमेदवारी स्वीकारल्यानंतर भाजपाला ६ उमेदवारांची नावे पूढे आणावी लागली. लोकांचा कल जाणून घ्यावा लागला. उमेदवारी जाहीर करताना भाजपला माढ्यातून उमेदवार सापडत नसल्यामुळे रणजित निंबाळकर यांना भाजपामध्ये घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी लागली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदार संघामध्ये उमेदवारी देतानाच भाजपाची दमछाक झाली होती.

त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माढा लोकसभा मतदार संघ हा प्रतिष्ठेचा केला आहे. राज्य सरकार संपूर्ण राज्यातील यंत्रणा आणि मंत्रिमंडळातील निम्मे मंत्री हे माढा लोकसभा मतदार संघात ठाण मांडून आहेत. त्यामुळे भाजपाने संजय शिंदे यांची किती धास्ती घेतली आहे, हे लक्षात येत असल्याचे संजय शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

Intro:R_MH_SOL_02_06_SANJAY_SHINDE_ON_BJP_S_PAWAR

माझा नाद करू नका, मला पण संजय शिंदे म्हणतात,
चंद्रकांत पाटलांच्या धमकीनंतर संजय शिंदेचे आव्हान
सोलापूर-
माझा नाद करू नका, मला संजय शिंदे म्हणतात अशा शब्दात माढ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना थेट आव्हान दिले आहे. संजय़ शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अर्ज मागे घेण्याची अजूनही वेळ गेली नाही असे म्हणत त्यांच्या तीन प्रकरणाची लवकरच चौकशी करण्यात येईल असा धमकी वजा इशारा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर, पंढरपूर व करमाळ्यातील सभेमध्ये दिला होता. Body:माढा लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून संजय शिंदे यांनी निवडणूक लढवावी यासाठी भाजपाने खूप प्रयत्न केले होते. सुरूवातीपासून संजय शिंदे यांनी मी लोकसभेसाठी इच्छून नाहीतर मला करमाळा विधानसभा निवडणूक लढवायची आहे असे सांगत भाजपाला माढ्यातून लढण्यास नकार दिला होता. मात्र ऐनवेळी विजयसिंह मोहिते पाटील हे भाजपामध्ये गेल्यामुळे संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माढ्यातून उमेदवारी स्विकारली. यामूळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे चांगलेच खवळले आहेत. संजय शिंदे यांची चौकशी लावू असा धमकी वजा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला होता.
चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या धमकी वजा इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माढ्याचे उमेदवार संजय शिंदे यांनी देखील त्यांनाच त्याच भाषेत उत्तर दिले आहे. शुक्रवारी अकलूज परिसरात झालेल्या सभेमध्ये बोलतांना संजय शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना थेट आव्हान दिले आहे. 'मला संजय शिंदे म्हणतात माझा नाद कराल तर मी पण शेवटपर्यंत नादच करत असतो' असे आव्हान संजय शिंदे यांनी दिले आहे.

राज्यातील सगळी यंत्रणा आणि अर्धे मंत्रिमंडळ माढ्यात -
संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माढ्यातून उमेदवारी स्विकारल्यानंतर भाजपाला 6 उमेदवारांची नांवे पूढे आणावी लागली आणि लोकांचा कल जाणून घ्यावा लागला. उमेदवारी जाहीर करतांना भाजपाला माढ्यातून उमेदवार सापडत नसल्यामुळे भाजपाला कॉंग्रेसमधून रणजित निंबाळकर यांना भाजपामध्ये घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी लागली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदार संघामध्ये उमेदवारी देतांनाच भाजपाची दमधाक झाली होती. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माढा लोकसभा मतदार संघ हा प्रतिष्ठेचा केला आहे. राज्य सरकार संपूर्ण राज्यातील यंत्रणा आणि मंत्रिमंडळातील निम्मे मंत्री हे माढा लोकसभा मतदार संघात ठाण मांडून आहेत. त्यामुळे भाजपाने संजय शिंदे यांची किती धास्ती घेतली आहे हे लक्षात येत असल्याचेही संजय शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
Conclusion:नोट- सोबत बाईट आणि व्हीडीओ जोडला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.