मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री कल्की कोचलिन ही सध्या पाच वर्षांच्या मुलीची आई आहे. सॅफी या गोड मुलीबद्दल असलेल्या नात्याबद्दल तिनं खास मुलाखतीत बऱ्याच गोष्टी सांगितल्या. 2020 मध्ये कल्की आणि तिचा पती गाय हर्शबर्ग आई वडील बनले. आई होण्यासाठी किती कठीण दिव्यातून जावं लागतं याबद्दल तिनं मोकळेपणानं भाष्य केलंय. कल्कीची भूमिका असलेला 'ये जवानी है दिवानी' हा चित्रपट रि-रिलीज झाला. याबद्दल बोलताना तिनं आई होण्याच्या अनुभवाबद्दल आपली मतं शेअर केली.
"मला वाटतं की आई म्हणून तुम्ही जेव्हा मुलाला जन्म देता, त्यासाठी गरोदरदरम्यानंचे संपूर्ण नऊ महिने आणि त्यानंतर जन्म देताना होणाऱ्या वेदना, या सर्वासाठी तुम्हाला खूप काही द्यावं लागतं. याकाळात तुमचं शरीर दुसऱ्या व्यक्तीचं गुलाम असल्यासारखं असतं, शब्दशः सांगायचं तर तुम्ही बाळासाठी फक्त एक इनक्युबेशन सिस्टम असता. बाळ तुमच्याकडून सर्व पोषक द्रव्य आणि ऊर्जा घेत असतं,"असं कल्की म्हणाली.
"पहिले ६ महिने देखील खूप कठीण होते, तुम्हाला बाळाला दूध पाजण्यासाठी संपूर्ण रात्र जागं राहावं लागतं, तुम्हाला योग्य झोप मिळत नाही. तुम्हाला सगळीकडेचं जाघरुकपणे लक्ष द्यावं लागतं. बाळाला स्तनपान करताना तुमच्यातील पोषणंही बाळाकडे जातं, त्यामुळे तुमच्यातील न्यूट्रिशन्स विस्कळीत होऊन जातं. माझं स्वतःचं आयुष्य कुठंय? मी कोण आहे? अशा विचारत तुम्ही हरवेले असता. तर, मला वाटतं की हा भाग खूप कठीण असतो आणि किती बिकट असतो याबद्दल कोणीही बोलत नाहीत.", असं कल्की कोचलिन म्हणाली.
कल्की कोचलिननं २०२० मध्ये मुलीला जन्म दिला. आता पाचवर्षानंतर तिची मुलगी सॅफोशी तिचं छान नातं तयार झालंय. याबद्दल बोलताना ती म्हणाली, "माझी मुलगी आता बोलकी झाली आहे. आम्ही गुपितं शेअर करतो. मी तिला माझ्या समस्याही सांगते. जणू काही ती माझी एक नवीन मैत्रीण आहे. आमचं खूप चांगलं जुळतं. ती मला समजून घेते आणि मला काम करण्याचं स्वातंत्र्य देते"
कल्की कोचिन २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील अदितीच्या भूमिकेमुळं लोकप्रिय झाली. हा चित्रपट अलीकडेच पुन्हा एका रिलीज झाला आहे. या चित्रपटाला चाहत्यांकडून आणि प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले होतं आणि कल्कीबरोबर रणबीर कपूर, दीपिका पदुकोण आणि आदित्य रॉय कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.