पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातील देहू येथील संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराच लोकार्पण करणार आहेत. यावेळी मंदिर ट्रस्टच्यावतीने पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून विशेष तुकाराम पगडी ( Tukaram Pagdi ) मोदींना भेट देण्यासाठी बनविण्यात आली ( Special Tukaram Pagdi For PM ) आहे. या पगडीवर संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांच्या काही पद लिहिण्यात आल्या होता. या पदाला काहींनी आक्षेप घेतल्याने आता हे अभंग बदलण्यात आल्या ( Tukaram Pagdi Abhang changed ) आहे.
अभंग बदलला - सुरुवातीला या पगडीवर 'भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी' हा अभंग टाकण्यात आल्या होत्या. परंतु, यावर काहींनी आक्षेप घेतल्यानंतर आता देहू संस्थानाने हा अभंग बदलल्या आहेत. आता या पगडीवर 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ' असा नवीन अभंग टाकण्यात आल्या आहेत.
यापूर्वी काढली होती शिवमुद्रा - या आधी देखील पुण्यात मेट्रो उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांना महापालिकेकडून देण्यात आलेल्या फेट्यावर शिवमुद्रा होती. मात्र, त्याला आक्षेप घेतला गेल्याने तीही काढण्यात आली होती. आता दुसऱ्यांदा पगडीवरील ओळी बदलण्यात आल्याचा समोर येत आहे.
पगडी भपकेबाज नसून पारंपरिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जी डिझायनर तुकाराम पगडी बनविण्यात आली आहे. ही भपकेबाज नसून पारंपरिक राहणार आहे. या मागचा आमचा उद्देशही तसाच आहे. देशाच्या पंतप्रधानांना आज तुकाराम महाराजांच्या विचारांची गरज आहे. त्यादृष्टीने आम्ही ज्या पद्धतीने तुकाराम महाराज जशी पगडी घालायचे तशी पगडी आम्ही बनवत आहोत. या साठी त्या काळी जे कापड ही पगडी बनविण्यासाठी वापरले जात होते, त्याच पद्धतीचे कापड आम्ही वापरला आहोत. ही पगडी वैशिष्ट्यपूर्ण आहे, ती घातल्यावर गंध आणि तीला वेगळी लावण्याची गरज पडणार नाही, असे यावेळी मुरूडकर यांनी सांगितले.
अशी आहे पगडी आणि उपरणे - ही पगडी अगदी साध्या पद्धतीने बनविली जाणार आहे. त्या काळी जे कापड पगडीसाठी लागायचे त्याच पद्धतीच्या कापडाने हे पगडी आणि उपरणे बनविले जात आहे.पगडीवर तुळशीच्या माळांची सजावट असणार आहे. या पगडीची केस आणि स्टँडही वैशिष्ट पूर्ण बनविण्यात आला आहे. पगडीचा स्टॅडच्या दोन्ही बाजूला लोड आहे. या सोबतच वर चीपळ्या ठेवण्यात आल्या आहेत. त्याला टाळांची सजावटही करण्यात आली आहे. या साठी डिझायनर उपरणे तयार करण्यात येत आहे. ऑफ व्हाईट रंगाची ही पगडी राहणार आहे. याच कापडाचे उपरणेही बनविले जाणार आहे. याच कापडावर तुकोबांचे निवडक अभंग लिहिले जाणार आहे. जगतगुरू तुकाराम आणि मोदी यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. यामुळे जेव्हा पंतप्रधान मोदींचा सत्कार ही पगडी घालून होईल. तेव्हा त्यांचे विचार आणि त्यांच आशीर्वाद या माध्यमातून मिळेल, अशा पद्धतीने सुचक पद्धतीन हे अभंग लिहिण्यात आले आहे. असे देखील यावेळी मुरुडकर यांनी सांगितले.
हेही वाचा - Aditya Thackeray Ayodhya Tour : आदित्य ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यामुळे शिवसेनेला फायदा