काश्मीरमधील शोपियानमध्ये जवानाची आत्महत्या - काश्मीर शोपियान जवानाची आत्महत्या न्यूज
पोलीस सूत्रांनी सांगितले की, शोपियान जिल्ह्यातील जावोरा गावात मुख्यालयातील सैनिक चंद्र पाटील यांनी सर्व्हिस रायफलने स्वत: ला गोळी झाडून घेतली. या प्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काश्मीर शोपियान लेटेस्ट न्यूज
श्रीनगर - गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात लष्कराच्या एका जवानाने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या जवानाचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - बिहारमध्ये पतीने पत्नीसह आणि 5 मुलांवर केले वार, चौघे ठार
पोलीस सूत्रांनी सांगितले की, शोपियान जिल्ह्यातील जावोरा गावात मुख्यालयातील सैनिक चंद्र पाटील यांनी सर्व्हिस रायफलने स्वत: ला गोळी झाडून घेतली. या प्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जवानाने हे पाऊल का उचलले, याचा तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - तेलंगाणात ट्रक- कारचा भीषण अपघात; सात जण जागीच ठार