ETV Bharat / bharat

रस्ता चुकलेल्या यात्रेकरुंच्या बसला आग; 6 जणांचा मृत्यू - Rajastha bus fire Jains death

जैन यात्रेकरू असलेली बस रस्ता चुकून महेशपुरा गावात पोहोचली. या गावातून परत निघत असताना बसचा वीजेच्या तारांशी संपर्क आला.

आग लागलेली बस
आग लागलेली बस
author img

By

Published : Jan 17, 2021, 4:32 AM IST

Updated : Jan 17, 2021, 10:24 AM IST

जयपूर- जालोर जिल्ह्याजवळ असलेल्या महेशपुरामध्ये बसला आग लाग लागून मोठी दुर्घटना झाली आहे. बसला वीजेचा तारांचा स्पर्श होऊन मोठी आग लागली. यावेळी लागलेल्या आगीत बसमधील 6 जणांचा मृत्यू झाला. तर २० से २५ जण जखमी झाली आहेत.

आग लागलेली बस
आग लागलेली बस

जैन यात्रेकरू असलेली बस रस्ता चुकून महेशपुरा गावात पोहोचली. या गावातून परत निघत असताना बसचा वीजेच्या तारांशी संपर्क आला. या बसला आग लागल्याची माहिती देताच स्थानिकांनी दिल्यानंतर १०८ रुग्णवाहिकेतून प्रवाशांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर स्थानिक सरकारी अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

आग लागलेली बस
आग लागलेली बस

पोलिसांच्या माहितीनुसार यात्रेकरू दोन बसमधून जात होता. वाहन चालक रस्ता चुकल्याने बस ही यात्रेकरूंना घेऊन महेशपुरा गावामध्ये पोहोचली.

मात्र, जेव्हा रस्ता चुकल्याचे चालकाला कळाले, तेव्हा त्याने वाहन मुख्य मार्गावर नेण्यास सुरुवात केली. तेव्हा बसच्या कंडक्टरने वीजेच्या तारा कमी उंचीवर असल्याचे पाहिले. काही कळायच्या आत बसमध्ये विद्युतप्रवाह उतरला आणि बसला आग लागली. या आगीतच 6 जणांचा मृत्यू झाला.

आगीत बसचे झालेले नुकसान
आगीत बसचे झालेले नुकसान
Last Updated : Jan 17, 2021, 10:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.