रायपूर : छत्तीसगडच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत तब्बल 16 नक्षलवादी ठार करण्यात जवानांना यश आलं. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावर अद्यापही नक्षलवाद्यांची शोधमोहीम सुरू आहे. ओडिशा पोलीस मुख्यालयाकडून या कारवाईबाबत माहिती जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई ओडिशातील नुआपाडा आणि छत्तीगडमधील गरियाबंद जिल्ह्यात छत्तीसगड पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांकडून राबवण्यात येत आहे.
#UPDATE | Gariaband encounter: So far 16 Naxals' bodies have been recovered. AK 47, SLR, INSAS and other automatic weapons have been recovered. Search operation is ongoing: IG Raipur Zone Amresh Mishra https://t.co/eR1pv9KKX5
— ANI (@ANI) January 21, 2025
नक्षलवादी आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये चकमक : छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यात रविवारपासून सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सोमवारी रात्री उशिरा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा चकमक झाली. या चकमकीत तब्बल 16 नक्षलवादी ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं. ओडिशा पोलीस मुख्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. घटनास्तळावरुन जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारूगोळा जप्त केला आहे. घटनास्थळी अद्यापही शोध मोहीम राबवण्यात येत आहे.
ओडिशा, छत्तीसगडच्या सीमेवर चकमक : छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्यात आणि छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातील सीमावर्ती भागात संयुक्त कारवाई केली आहे. या परिसरात नक्षलवादी लपल्याची माहिीत जवानांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पहिली चकमक सोमवारी दुपारी गरियाबंदमधील मैनपूरच्या भालुदिघी टेकड्यांच्या जंगलात झाली. या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार करण्यात जवानांना यश आलं. छत्तीसगडच्या कोब्रा बटालियन आणि ओडिशाच्या पोलीस दलानं संयुक्तपणे ही कारवाई केली.
हेही वाचा :