ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेश पोलिसांबरोबरील चकमकीत चार गुंड ठार, पोलीस निरीक्षक गंभीर जखमी - UP POLICE ENCOUNTER

उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सबरोबर झालेल्या चकमकीत सोमवारी रात्री चार गुंड ठार झाले आहेत. तर गुंडांनी केलेल्या गोळीबारात पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत.

UP Police Encounter
उत्तर पोलीस एन्काउन्टर (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2025, 9:01 AM IST

शामली (लखनौ) - देशभरात उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी आणि पोलिसांनी केलेलं एन्काउन्टर नेहमीच चर्चेत असतं. उत्तर प्रदेशच्या एसटीएफ ( UP Special Task force) मेरठ युनिटनं ४ कुविख्यात गुंडांना चकमकीत ठार केलं. हे सर्व गुंड मुस्तफा कग्गा टोळीतील होते. एसटीएफ आणि गुंडांमध्ये रात्री चकमक सुरू होती. यावेळी चकमकीत गोळी लागल्यानं एसटीएफचं नेतृत्व करणारे पोलीस निरीक्षक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एसटीएफनं शामलीमधील झिंझाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुस्तफा कग्गा टोळीवर मोठी कारवाई केली. पोलिसांनी टोळीतील मुख्य गुंडासंह एक लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या अरशद, सतीश आणि चौथ्या अज्ञात गुंडाला ठार केलं. टोळीतील मुख्य गुंड अरशद हा गंगोह बाहडी माजरा गाव जनपद सहारनपूरमधील रहिवासी होता. अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता.

अरशदवर १२हून अधिक गंभीर गुन्हे- अरशद आणि त्याच्या साथीदारांनी एसटीएफच्या पथकावर सोमवारी रात्री हल्ला केला. या हल्ल्याला एसटीएफच्या पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं. पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत चार गुंड गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. अरशदवर १२हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, दरोडा आणि लूट अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. एसटीएफच्या पथकाचं नेतृत्व करणारे सुनील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गुरुगाममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • एसटीएफचे एएसपी बृजेश कुमार यांनी सांगितलं, " चकमकीत उत्तर प्रदेश पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. अरशदसारख्या कुविख्यात गुन्हेगाराला ठार केल्यानं कायदा आणि व्यवस्था अधिक बळकट होईल. चकमकीत मृत्यू झालेल्या गुंडांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे."

हेही वाचा-

  1. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी केली गावकऱ्याची हत्या
  2. महाराष्ट्राच्या भामट्याची यूपीच्या जज तरुणीशी सोशल माध्यमातून जुळली मैत्री; लाल दिव्याची गाडी घेऊन गेला, अन् जबरीनं केलं 'असं' कृत्य
  3. छत्तीसगडमध्ये जवानांना मोठं यश; 12 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
  4. अक्षय शिंदे एन्काउन्टर प्रकरणात पाच पोलिसांवर दाखल होणार गुन्हा, चौकशी अहवाल न्यायालयात सादर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.