महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलनं मोजकी क्लिप कापून व्हायरल केली" सुधीर मुनंगटीवार यांची वादग्रस्त व्हिडिओवर प्रतिक्रिया - Sudhir Mungantiwar - SUDHIR MUNGANTIWAR

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 8:04 PM IST

Updated : Apr 11, 2024, 10:33 AM IST

चंद्रपूर Sudhir Mungantiwar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या चंद्रपूरमध्ये झालेल्या सभेत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या भाषणाचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सुधीर मुनंगटीवार यांच्या कथित वादग्रस्त भाषणावरून काँग्रेससह विरोधकांनी टीका केली. यावर चंद्रपूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनंगटीवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले,  "देशात हुकूमशाही येईल, असं बोलण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही. काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलनं केवळ मोजकी क्लिप कापून ती व्हायरल केली. माझ्या वक्तव्याला आणीबाणी आणि शीख दंगलीचा संदर्भ होता.  मी इतिहास सांगितला. मात्र, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला." सुधीर मुनगंटीवार यांचा भाजपाचा स्टार प्रचारक म्हणून लोकसभा निवडणूक प्रचार मोहिते समावेश करण्यात आला आहे. ते नेमक्या कुठल्या जागांचा प्रचार करण्यासाठी जाणार याबाबत विचारणा केली असता सुधीर मुनंगटीवार म्हटले, " सध्या मी माझ्या प्रचारात व्यस्त आहे. माझा प्रचार उरकला तर इतर ठिकाणी जाईल."

Last Updated : Apr 11, 2024, 10:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details