आशा भोसलेंनी बजावला मतदानाचा हक्क; नागरिकांना केलं मतदान करण्याचं आवाहन - ASHA BHOSLE ASSEMBLY VOTING
Published : Nov 20, 2024, 3:57 PM IST
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. एकूण 288 विधानसभा मतसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्व नागरिकांनी पुढं येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असं आवाहन अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सर्वसामान्य लोक, राजकीय नेते आणि मनोरंजन जगतातील सेलिब्रिटी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडताना दिसत आहेत. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तसंच नागरिकांना सुद्धा मतदान, करण्याचं आवाहन त्यांनी केलं. आशा भोसले यांनी आपल्या संगीत कारकिर्दीत आपल्या गोड आवाजानं एकापेक्षा एक सुपरहिट गाणी गायली आहेत. अक्षय कुमार, सुबोध भावे, फरहान अख्तर, रितेश देशमुख, जेनेलिया डिसूजा, उर्मिला मातोंडकर, सोनू सूद विशाल ददलानी, राजकुमार राव आणि सोनाली कुलकर्णी यासह अनेक सेलिब्रिटींनी मतदानं केलंय.