शिर्डीत पहिल्या श्रावणी सोमवारी साईचरित्र पारायणास सुरुवात, साईमंदिरातून काढण्यात आली सवाद्य मिरवणूक - Sai Mandir Shirdi
Published : Aug 5, 2024, 4:00 PM IST
शिर्डी Sai Mandir Shirdi : आजपासून श्रावण महिना सुरू झालाय. या महिन्यात अनेक धार्मिकस्थळी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. शिर्डीतही आज पहिल्या श्रावणी सोमवारपासून साईचरित्र पारायणाला सुरूवात झाली. शिर्डी साईबाबा संस्थान आणि नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सोहळा 5 ते 12 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. सकाळी समाधी मंदिरातून साईबाबांच्या श्री साईसच्चरित ग्रंथाची आणि फोटोची हनुमान मंदिर आणि व्दारकामाई मार्गे रथातून साई आश्रम येथील पारायण मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गेल्या 29 वर्षा पासून शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानच्या वतीनं शिर्डीत श्रावण महिन्याच्या सुरूवातली शिर्डीत साईचरित्र पारायणाचं आयोजन करण्यात येतं. यंदाचं तिसावं वर्ष असून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांसह भाविकांनी सहभाग घेतला आहे.