ETV Bharat / state

बुलढाणा जिल्ह्यातील 'हा' किल्ला युद्धासाठी कायम सज्ज, परंतु शत्रू कधी फिरकलेच नाहीत, पाहा व्हिडिओ - BULLDHANA GONDHANAPUR FORT

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीत महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बुलढाणातील 'गोंधनापूर किल्ला' (Gondhanapur Fort) युद्धासाठी कायम सज्ज असायचा. परंतु, या किल्ल्यावर शत्रू फिरकले नाहीत.

Bulldhana Gondhanapur Fort
बुलडाणा जिल्ह्यातील किल्ला (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2025, 6:25 PM IST

Updated : Jan 2, 2025, 7:51 PM IST

अमरावती : पंधराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत आशिया खंडातील सर्वात सुपीक जमीन पिंपळगाव राजा परगण्याअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील निमगाव परिसरात आहे. मुघलांना या भागातून सर्वाधिक महसूल मिळत असे. महसुलीचं मुख्य केंद्र असणाऱ्या या भागात पुढे नागपूरकर भोसल्यांनी पिंपळगाव राजा पासून काही अंतरावर तत्कालीन गोंधन खेड आणि आजच्या गोंधनापूर येथे गढीच्या ठिकाणी किल्ला बांधला. नागपूरकर भोसलेंचा कोषागार असणारा हा किल्ला कायम युद्धासाठी सज्ज होता. किल्ल्याच्या चारही बुरुजांवर सज्ज असणाऱ्या तोफा शत्रूंची वाट पाहत होत्या. सारा वसुलीचं महत्त्वाचं केंद्र असणाऱ्या या किल्ल्यावर मात्र शत्रूंनी कधीच आक्रमण केलं नाही. गोंधनापूर येथील (Gondhanapur Fort) या वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्यासंदर्भात "ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट.

किल्ल्याचा असा आहे इतिहास : खामगाव शहरापासून काही अंतरावर पिंपळगाव राजा या ठिकाणी मुघल सम्राट अकबरानं 1555 मध्ये किल्ला उभारला. या भागातून मुघल त्यावेळी चार कोटी रुपयांचा महसूल मिळवत असत. मोठा काळ हा परिसर मुघलांच्या ताब्यात होता. पुढे नागपूरकर भोसल्यांची सत्ता या परिसरात आली आणि पिंपळगाव राजा लगतच त्याकाळी असणाऱ्या गोंधन खेड आणि आजच्या गोंधनापूर या ठिकाणी 1791 मध्ये गडीच्या ठिकाणी किल्ला उभारण्यात आला. 1795 मध्ये या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झाल्यावर या किल्ल्यावर पहिले किल्लेदार म्हणून मुरडाजी पाटील वानखडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती इतिहासाचे प्रा. डॉ. किशोर वानखडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

प्रतिक्रिया देताना इतिहास अभ्यासक प्रा.डॉ. किशोर वानखडे (ETV Bharat Reporter)

नागपूरकर भोसल्यांचं महत्त्वाचं कोषागार : पिंपळगाव राजासह लगतच्या मोठ्या सुपीक प्रदेशातून जमा होणारा महसूल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं कोषागार म्हणून गोंधनापूरचा किल्ला हे नागपूरकर भोसलेंचं महत्त्वाचं ठिकाण होतं. या किल्ल्यावर जमा होणारा महसूल पुढे बाळापूर येथील किल्ल्यावरून नरनाळा आणि गाविलगड किल्ल्यावर पोहोचायचा. या चारही महत्त्वाच्या ठिकाणावरील सर्व महसूल गाविलगडावरून पुढे नागपूरला जात अशी माहितीदेखील प्रा. डॉ. किशोर वानखेडे यांनी सांगितलं.

किल्ल्याचं असं आहे वैशिष्ट्य : गोंधनापूर येथील किल्ल्यावर एकूण 52 खोल्या आजही शाबूत आहेत. यापैकी काही खोल्यांमध्ये आजही जाता येतं. इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्यावर देखील बारा महाल आणि अठरा कारखाने बांधले होते. त्यांचे अवशेष आज देखील या किल्ल्यावर शाबूत आहेत. धान्य कोठार, रत्नशाळा, शस्त्रागार या ठिकाणी अस्तित्वात असल्याचं किल्ला पाहताना लक्षात येतं. या ठिकाणी परिसरातील गावातील दागिन्यांची व्यापारी दागिने विकण्यासाठी येत.

किल्ल्यात जल व्यवस्थापन : किल्ल्यामध्ये मुबलक पाणी मिळावं, यासाठी योग्य जल व्यवस्थापन आहे. जल व्यवस्थापनासाठी किल्ल्याच्या आतमध्ये दोन विहिरी आणि किल्ल्याच्या बाहेर दोन पाय विहिरी आणि तीन गोलाकार विहिरींची रचना केली होती. किल्ल्याच्या बाहेर असणाऱ्या पाय विहिरीतून या किल्ल्यामध्ये पाणी आणण्याची व्यवस्था त्या काळात करण्यात आली. किल्ल्यामध्ये असणाऱ्या राजाच्या महालासमोर मध्यभागात कारंजा देखील या ठिकाणी आढळतो. विशेष म्हणजे रायगडावर ज्याप्रमाणे शौचालय आहेत अगदी तसेच दोन शौचालय या किल्ल्यावर देखील दिसतात.

संरक्षणासाठी किल्ला सज्ज : नागपूरकर भोसलेंचं कोषागार असणाऱ्या या किल्ल्याच्या संरक्षणासाठी भव्य शस्त्रागार किल्ल्यात होतं. किल्ल्याच्या चारही बुरुजांवर तोफ कायम सज्ज होत्या. किल्ल्यावर शत्रू चढून आले तर त्यांचा मुकाबला करण्याची संपूर्ण व्यवस्था किल्ल्याच्या वर करण्यात आली. दुरूनच येणारा शत्रू दिसावा, अशी व्यवस्था देखील या किल्ल्यावर आहे. किल्ल्यातून बाहेर दूर अंतरावर निघण्याचा गुप्त मार्ग देखील आहे. महत्त्वाची बाब म्हणजे युद्धासाठी कायम सज्ज असणाऱ्या या किल्ल्यावर कधीच कोणत्या शत्रूचं आक्रमण झालं नाही.

1940 मध्ये किल्ल्याला लागली आग : या किल्ल्याला 1940 मध्ये आग लागली. या आगीत दोन मजली असणारे महाल कोसळले. मजबूत असे लाकडाचे छत जळालं. नागपूरकर भोसले यांच्या मालकीचा असलेला हा किल्ला नागपूरकर भोसलेंनी पुढे इंग्रजांकडे हस्तांतरित झाला. किल्ल्याची किल्लेदारी मात्र वानखडे कुटुंबाकडेच होती. 1947 पर्यंत या किल्ल्याचे मुखत्यारपत्र स्वरूपात असणारी कागदपत्रे आजही आमच्या कुटुंबाकडे आहे, असं प्रा. डॉ. किशोर वानखडे अभिमानाने सांगतात.

हेही वाचा -

  1. मेळघाट परिसरातील वाघाच्या मृत्यू प्रकरणी चार आरोपींना अटक; दगावला की घातपात?
  2. डरकाळी फोडत आला वाघ: मेळघाटच्या जंगलात पर्यटकांनी अनुभवला थरार; व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा - Melghat Tiger Reserve
  3. मेळघाटात गवळी बांधवांची घरवापसी; गुरांना चारा, पाणी मिळावं यासाठी सहा महिन्यासाठी केलं होतं स्थलांतर - CATTLE OWNERS RETURNED IN MELGHAT

Last Updated : Jan 2, 2025, 7:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.