ETV Bharat / state

माझ्या मुलीला सांभाळा...,सावकारी जाचाला कंटाळून रिक्षाचालकाची आत्महत्या; चार जणांवर गुन्हा दाखल - RICKSHAW DRIVER SUICIDE

पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सावकारी जाचामुळं एका रिक्षाचालकानं आपलं जीवन संपवलं. त्यापूर्वी त्यानं व्हिडिओ तयार केला आणि सुसाईड नोट लिहिली.

Rickshaw Driver Suicide
रिक्षाचालकाची आत्महत्या (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2025, 10:21 PM IST

पिंपरी चिंचवड : शहरातील रिक्षाचालक तरुणाने पत्नी, मुलगा, मुलगी यांची माफी मागत राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना चिंचवड स्टेशन येथील साईबाबानगर येथे घडली. रजनी सिंग, राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, असा व्हिडिओ तयार करत आणि सुसाईड नोट लिहित रिक्षाचालक तरुणानं आत्महत्या केली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांनी दिली.

काय म्हटलं व्हिडिओमध्ये : राजू राजभर यांनी म्हटलं की, मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकारांच्या जाचाला कंटाळून मी आपलं जीवन संपवण्याचा चुकीचा निर्णय घेत आहे. मला माफ करा, असं भावनिक आवाहन करत राजू नारायण राजभर या तरुणानं राहत्या घरात आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडियो तयार करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

प्रतिक्रिया देताना सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.विशाल हिरे (ETV Bharat Reporter)

माझ्या मुलीला सांभाळा : आपलं जीवन संपवण्यापूर्वी राजू राजभर यांनी त्यांची पत्नी आणि लहान मुलीबाबत चिंता मांडली आहे. ते म्हणाले, माझ्या छोट्या मुलीला सांभाळा. माझ्या अंत्यसंस्कारासाठी माझ्या पत्नीकडं पैसे नसल्यानं माझा अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीत करा. आता या प्रकरणात निगडी पोलिसांनी रजनी सिंग, राजीव कुमार, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे या चार आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांनी दिली.

सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालकाचा मुलगा गणेश राजु राजभर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी गणेश यांचे वडील राजू राजभर हे रिक्षा चालवत होते. त्यांनी आरोपींकडून हातउसने पैसे घेतले होते. ते पैसे परत करुन देखील त्यांचे शिल्लक असलेल्या व्याजाची रक्कम परत न केल्याच्या कारणावरून आरोपींनी घरात घुसून तुला मारुन टाकू, तुला कापून टाकू, अशा वारंवार धमक्या देत होते. या धमक्यांमुळं ते सतत तणावात होते. हा तणाव सहन न झाल्यानं त्यांनी शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आत्महत्या केली. निगडी पोलीस ०३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५२. ३(५) महाराष्ट्र सावकारी अधिनीयम कलम ३९ प्रमाणे अधिकचा तपास करत आहेत.

हेही वाचा -

  1. हॉटेल बुकींग एजंटची लॉडविक पॉइंटवर आत्महत्या, साडेपाचशे फूट दरीतून बाहेर काढला मृतदेह
  2. भावकीतील मुलाशी प्रेमसंबंध; प्रेमभंगातून अल्पवयीन तरुणीची आत्महत्या, प्रियकरावर गुन्हा
  3. दुचाकीला कट मारल्यानं मारहाण, तरुणाच्या आत्महत्येनंतर एसटी चालकाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.