नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाची सूत्रे पुन्हा हाती घेतल्यानंतर अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांना (Illegal Indian) मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. अमेरिकेनं अवैधपणे त्यांच्या देशात प्रवेश केलेल्या १०४ भारतीयांना मायदेशी पाठवलं. भारतीय नागरिकांशी अमेरिकेने गैरव्यवहार करत त्यांना बेड्या ठोकल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिलं.
Speaking in Rajya Sabha, EAM Dr S Jaishankar says, " the authorities have been given instructions to sit with every one of the returnees (indians deported from the us) and find out how they went to america, who was the agent, and how do we take precautions so that this does not… pic.twitter.com/U5K0bDN52u
— ANI (@ANI) February 6, 2025
अमेरिकेच्या सरकारशी चर्चा सुरू : "बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना मायदेशात परत पाठवण्यात आलं. अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१२ पासून अवैधपणे अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांना लष्करी विमानांद्वारे परत पाठवण्यात येतं. ही कारवाई करत असत्याना या नागरिकांच्या अन्न आणि इतर गरजा पूर्ण केल्या जातात. गरज पडल्यास या नागरिकांना तात्पुरत्या बेड्याही घातल्या जातात," अशी माहिती एस. जयशंकर यांनी राज्यसभेत दिली. जयशंकर म्हणाले की, "भारत सरकार अमेरिकेच्या सरकारशी सतत चर्चा करत आहे, जेणेकरुन अशा पद्धतीनं कारवाई होऊ नये."
विरोधकांचा हल्लाबोल : अमेरिकेतून बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांच्या हद्दपारीवर शिवसेनेच्या (UBT) खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, "ज्या प्रकारे त्यांना परत पाठवण्यात आलं ते चुकीचं आहे. त्यांना साखळदंडानं बांधण्यात आलं आणि त्यांना वॉशरूम वापरण्याची परवानगीही देण्यात आली नाही, मला अमेरिकेला आठवण करून द्यायची आहे की, ते गुन्हेगार नाहीत. त्यांना अपमानास्पद रीतीनं पाठवलं गेलं आणि ते आम्हाला मान्य नाही." टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले, "आम्ही परकीय धोरण प्रकरणांवर बोलत नाहीत. परंतु, ज्या प्रकारे त्यांना हातकडी घालून हद्दपार केलं, ते स्वीकारार्ह नाही. हे मानवी हक्कांचं घोर उल्लंघन आहे."
#WATCH | Delhi: On deportation of illegal Indian immigrants from the US, Shiv Sena (UBT) MP Priyanka Chaturvedi says, " ... the way they were sent back, they were chained and were not even allowed to use the washroom, i want to remind america that they are not criminals. they are… pic.twitter.com/xhwaTX9R2R
— ANI (@ANI) February 6, 2025
अशा घटना याआधीही घडल्या आहेत : काँग्रेस खासदार रणदीप सिंग सुरजेवाला यांनी अमेरिकेतून हद्दपार केलेल्या भारतीय नागरिकांवर राज्यसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, "आम्हाला माहिती आहे की काल 104 लोक परत आले आहेत. आम्हीच त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पुष्टी केली आहे. हा नवा मुद्दा आहे असे आपण समजू नये. हा यापूर्वीही झालेला मुद्दा आहे. अधिकाऱ्यांना परत येणाऱया प्रत्येक व्यक्तीसोबत (अमेरिकेतून परत आलेले भारतीय) बसून ते अमेरिकेत कसे गेले, त्यांचे एजंट कोण होते हे जाणून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."
हेही वाचा -